येवला – तालुक्यातील ठाणगाव येथील सागर शेळके या तरुण शेतकऱ्याने आपल्या दीड एकर उभे कांदा पीकाला आग लावून जाळून टाकत नांगर देखील फिरवला. एकच तास लाईट असल्यामुळे कांदा पिकाला पाणी देता येत नसल्याने हा तरुण शेतकरी संतप्त होता. मोठ्या कष्टाने या शेतकऱ्यांनी कांदा पीक घेतले होते. मात्र लाईट एकच तास राहत असल्याने या एक तासा मध्ये कांदा पिकाला पाणी देणे होत नव्हते. त्यातूनच उन्हाचा वाढता तडाका यामुळे कांदा पीक पूर्णपणे वाळू लागल्याने संतप्त होत शेतकऱ्याने पूर्ण पीक जाळून टाकले. या पिकावर नांगर देखील फिरवत टोकाचं पाऊल उचलले .वीज महावितरणाचा लोडशेडिंगचा फटका या शेतकऱ्याला सहन करावा लागला आहे.