येवला – येवला तालुक्यातील नागडे गावात लग्न जमत नसल्याने भोंदू बाबाकडे गेलेल्या महिलेसह तिच्या तीन मुलींवर बाबाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी भोंदूबाबाला अटक केली आहे. भोंदूबाबाने आईसह तिन्ही मुलींना चाकूचा धाक दाखवत अत्याचार करून त्याचा व्हिडीओ काढला. त्यानंतर आई व तिन्ही मुलींवर भोंदूबाबा व त्याच्या सहकारीने तब्बल दोन वर्षे चार महिने वेळोवेळी अत्याचार केला. तसेच, ब्लॅकमेल करत आतापर्यंत आठ लाख रुपये उकळल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. या संदर्भात येवला शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती दिली असून त्यात म्हटले आहे की, आपल्या मुलीचे लग्न जमत नसल्याने आई येवला तालुक्यातील नागडे गावातील एका बाबाकडे गेली. त्यावेळी बाबाने मुलीला जादूटोणा झाल्याचे सांगितले. त्यानंतर जादूटोणाची अडचण दूर करण्याच्या नावाखाली महिलेसह तिच्या तीन्ही मुलींवर अत्याचार केला. मुलीला जादूटोणा झाल्याचे सांगत सलग दोन वर्षे भोंदूबाबा व त्याच्या भावाने आईसह तिच्या मुलींवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.