नाशिक – पक्षाच्या कामकाजासाठी विविध क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांची साथ आम्हाला मिळाली असून सर्व प्रवेश केलेल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जोमाने कामाला लागावे अशा सूचना राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत आज येवला संपर्क कार्यालयात येवल्याचे माजी नगराध्यक्ष भोलाशेठ लोणारी,माजी नगराध्यक्ष व अपक्ष नगरसेवक शफिक शेख, भाजपचे नगरसेवक सुनील काबरा यांच्यासह विविध पक्षाचे आजी माजी नगरसेवक तसेच विविध सामाजिक संस्थांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीत प्रवेश केला. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीत स्वागत करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, येवला बाजार समितीचे प्रशासक सभापती वंसत पवार, माजी नगराध्यक्ष हुसेन शेख,शहराध्यक्ष दिपक लोणारी, राजेश भांडगे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत आज येवला संपर्क कार्यालयात पार पडलेल्या प्रवेश सोहळ्यात येवल्याचे माजी नगराध्यक्ष भोलाशेठ लोणारी, शफिक शेख, भाजपचे नगरसेवक सुनील काबरा, येवला बाजार समितीचे माजी संचालक उमेश अट्टल, व्यापारी महेश काबरा, पुरुषोत्तम काबरा, साईनाथ मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष महेश काबरा, गोविंद मुंदडा, अभिजित अट्टल, डॉ.अशोक करवा, राजकिशोर शिवनारायण काबरा, निरंजन परदेशी, सुनील गवळी, प्रमोद खिरुड, उमेश काबरा, शारुख शेख, रमेश लोढा, सचिन काबरा, हर्षद पारख, स्वानंद काबरा यांच्यासह पाधिकारी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीत प्रवेश केला.