येवला – गानकोकिळा लता मंगेशकर यांना येवल्यातील कलाकार संतोष राऊळ यांनी अनोखी श्रद्दांजली दिली. केळीच्या पानावर लतादीदींचे दोन वेगवेगळे चित्र रेखाटत लतादीदींना ही श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी राऊळ कुटुंबांनी या केळीच्या पानाभवती पणत्या पेटवल्या. या कलाकाराने एक कोकिळेचे देखील चित्र काढत लतादीदी गानकोकिळा असल्याचे चित्रातून साकरले आहे.