नाशिक- येवला विधानसभा मतदारसंघातील निफाड तालुक्यातील प्रमुख जिल्हा मार्ग ६९ पासून लासलगाव- निमगाव वाकडा-मरळगोई-गोळेगाव-भरवस- देवगाव- कानळद ते तास या इतर जिल्हा मार्गाला पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून प्रमुख जिल्हा मार्गाचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकरी व नागरिकांना दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध होणार आहे. निफाड तालुक्यातील प्रमुख जिल्हा मार्ग ६९ पासून लासलगाव- निमगाव वाकडा-मरळगोई-गोळेगाव-भरवस- देवगाव- कानळद ते तास या इतर जिल्हा मार्ग २६४,२६५,२६१ या एकूण २३ किलोमीटर रस्त्याला प्रमुख जिल्हा मार्ग १८७ हा क्रमांक प्राप्त झाला आहे. हा इतर जिल्हा मार्ग दरजोन्नत झाल्यामुळे लवकरच या रस्त्याची सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुधारणा होऊन नागरिकांना दळणवळणाच्या चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहे.