येवला – शहराच्या विविध समस्यांबाबत येवला नगरपालिकेला जागृत करण्यासाठी येवला शहर व तालुका काँग्रेस कमिटीतर्फे देवी खुंट, येवला येथे जागरण गोंधळ करण्यात आले. येवले शहरातील रस्त्यांची झालेली दुरावस्था, घाणीचे साम्राज्य, स्वच्छता, जंतुनाशक फवारणी, शुद्ध पाणीपुरवठा, विंचूर चौफुली येथे सिग्नल बसवणे, अमरधाम येथे सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करणे, शहरातील जुनी नगरपालिका येथे एक खिडकी योजना सुरू करणे, व्यापारी संकुलाचा प्रश्न सोडवणे, मोकाट जनावरांचा कायदेशीर व सरकारी नियमानुसार बंदोबस्त करणे, शहरातील बंद पथदीप सुरू करणे, घरपट्टी व पाणीपट्टी दर कमी करणे आदींसह मागण्यांसाठी येवला शहर तालुका काँग्रेस कमिटी तर्फे जागरण गोंधळ करण्यात आले.
यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब मांजरे, सुरेश गोंधळी, जिल्हा उपाध्यक्ष रश्मी पालवे, तालुकाध्यक्ष ॲड.समीर देशमुख, शहराध्यक्ष प्रीतम पटणी, जरार पैलवान, अनिल पैलवान, शहर कार्याध्यक्ष नानासाहेब शिंदे, नंदकुमार शिंदे, सुखदेव मढवई, युवक अध्यक्ष मंगल परदेशी, अण्णासाहेब पवार, अमित पटणी, राजेंद्र गणोरे, राजे आबासाहेब शिंदे, अजिज शेख, मुकेश पाटोदकर, भास्कर पालवे, शफिक शेख, कैलास घोडेराव, दत्तू भोरकडे, शिवनाथ खोकले, गणेश ढिकले, दयानंद बेंडके, अशोक नागपुरे, बाबूलाल पडवळ, राजवीर शिंदे, बाबासाहेब गोरे, अहिलाजी झांबरे, गणेश पवार आदीसह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी हर्षल लाघवे, नितीन वंजारी, मोनिका वंजारी ,रंगनाथ शेलार यांनी गोंधळ साजरा केला.