येवला – तालुक्यातील तलाठी अतुल शंकर धुल यांनी वारसाला डावलून जमीन आपल्या पत्नीच्या नावावर केल्यानंतर आता प्रातांधिकारी यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. गेल्या महिन्यातच तालुक्यातील हडप सावरगाव येथे हा प्रकार समोर आला होता. या तलाठीने हडप सावरगाव गट नंबर ५७ /३ मधील ८ एकर शेतजमीन मूळ वारसांना डावलत नोंदीमध्ये फेरफार करून आपल्या बायकोच्या नावावर करून घेतली. हा सर्व प्रकार मूळ वारस दिव्यांग असलेल्या मंदा पवार रा. बाभळेश्वर, यांना आपल्या मातुलठान तालुका येवला येथील आपल्या गावी आल्यानंतर लक्षात आला. त्यानंतर त्यांनी तक्रार केल्यानंतर चौकशी करुन ही कारवाई करण्यात आली. या चौकशीत अनेक गैरप्रकारही समोर आले आहे. त्यामुळे शासकीय कामात अनियमितता केली म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे.
या निलंबनाच्या आदेशात सर्व कारणे दिली आहे.