नाशिक – येवला तालूक्यातील पुरणगाव येथील एका मुस्लीम कुटुंबाने आपल्या घरात श्रीगणेशाची स्थापना केली आहे. गेल्या पाच वर्षा पासून तो नियमीतपणे दरवर्षी गणेशाची स्थापना करत असतो. पण, त्याची फारशी माहिती कोणाला नव्हती. पण, ही माहिती आता समोर आली असून त्याचा हा भक्तीभाव सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरला आहे. विशेष म्हणजे त्याच्या या भक्तीला समाजानेही विरोध केला नाही व घरातल्या वडिलधा-यांकडून कोणी आक्षेप घेतला नाही. गणेशाची स्थापना करणारा रहेमान हा धर्माने मुस्लीम समाजाचा असला तरी त्याचे मित्र सर्वधर्मीय आहे. त्याचा फोटोग्राफीचा व्यवसाय असल्यामुळे त्यांचे सर्वांचे स्नेहाचे संबधही आहे. त्यामुळे त्याला देव सारखेच वाटतात. त्यामुळे त्याने गावातील उजव्या सोंडीच्या नवसाला पावणा-या सिध्दीविनायकाला एक नवस केला होता. त्याला देवही पावला. त्यानंतर त्याची गणपती बाप्पावर श्रध्दा वाढत गेली. आता तर तो दरवर्षी घरी श्रीगणेशाची स्थापना कुटुंबासह करतो. रहेमान या भक्तीबाबत सांगतो, मी सर्वधर्म समभाव मानतो, देव कुठलाही असो तो सर्वत्र सारखाच आहे अशी माझी भावना आहे.