येवला- महागाईच्या निषेधार्थ येवला शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रस्त्यावर चूल मांडून अनोखे आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारने नुकतीच गॅस सिलेंडरच्या दरात २५ रुपयाची वाढ केली असल्याने व सततची पेट्रोल, डिझेल,खाद्यतेल,डाळींच्या दारात प्रचंड वाढ केली असल्याने त्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला कार्यकर्त्या विंचूर चौफुली येथे जमून गॅस सिलेंडरला पुष्पहार घालून व रस्त्यावर चूल मांडून स्वयंपाक करून दर वाढीचा निषेध करण्यात आला.मोठा संख्येने महिला जमल्या असल्याने मनमाड कोपरगाव व नासिक औरंगाबाद राज्यमार्गावरची वाहतूक बराच वेळ ठप्प झाली होती.या वेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या मोदी सरकार हाय–हाय “या सरकारच करायचं काय खाली डोकं वर पाय” घोषणेने परिसर दुमदुमून गेला होता.
इंधन दर वाढ झाल्याने सर्वसामान्य जनतेला प्रचंड भुर्दंड सोसावा लागत असून महिला वर्गाचे स्वयंपाक घराचे बजेट कोलमडले आहे.कोरोनाच्या पार्शवभूमीवर आदीच जनता बेजार झाली आहे.व्यवसाय ठप्प झाले आहेत,बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत या परिस्थिती केंद्र सरकारने अडचणीत असलेलया जनतेला आधार देण्याची गरज असतांना सततची महागाई वाढत आहे.त्या मुळे जनता बेजार झाली आहे.सर्वसामान्य जनतेचा विचार न करता मनमानी केलेली दर वाढ ताबडतोब मागे घ्यावी म्हणून निवेदन नायब तहसीलदार बाळासाहेब हावळे यांना देण्यात आले या वेळी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री नामदार श्री छगन भुजबळ यांचे स्वीयसहाययक बाळासाहेब लोखंडे,येवला शहर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष राजश्री पहिलवान,तालुका अध्यक्ष सोनाली कोटमे,नर्गिस शेख,निता बिवाल,विमलबाई शहा,निता बिवाल, सिमा बोडके,निर्मला थोरात,सुचिता थोरात,निगार सकट,मंगल शिंदे,सुमय्या शेख,पुष्पा खलसे.अशाबाई सकट,बागुबाई मोहिन,मुमताज शेख,सोनाली शिंदे,मंगल शिंदे,मीरा खलसे,अनिता लोंढे,मोहिनी खैरनार,ताराबाई शिंदे,बिलकीस पठाण,हिना शेख,सुलोचना रिठे,वनिता कुचेकर,जोती रागपसरे,तानाबाई बोडके आदी मोठा संख्येने महिला कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या तसेच सुभाष गांगुर्डे,गोटू मांजरे,सुमित थोरात,प्रविण पहिलवान,भाऊसाहेब माळी,विक्रम त्रिभुवन आदी कार्यकर्ते उपस्थित होते.