येवला – समुद्री जैवविधतेच्या व जागतीक वातावरण बदलाच्या दृष्टीने आवश्यक असणारे समुद्री जीव Sea fans व Sea Black Corals ची तस्करी करणा-यांविरुध्द वननिभागाने सापळा रचून छापा टाकला आहे. या कारवाई करुन एकाला मुदेमालसह अटक केली आहे. सदर आरोपीस येवला येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीस २० ऑगस्टपर्यंत वन कोठडी दिली. या गुन्हयाचे धागेदारे गुजराथ व तामिळनाडु राज्यांची जोडली असल्याची प्राथमिक प्राप्त झाली आहे.
याबाबतीची माहिती वनविभागाने दिली आहे. १७ ऑगस्ट रोजी येवला – मनमाड रोडवर सापळा रचून योगेश रमेश दाभाडे रा. येवला याला मुद्देमालासह अटक केली आहे. त्याच्या घरी झडती घेण्यात आली. आरोपीकडून Sea fans व Sea Black Corals, सामुद्री शंख शिंपले, जंगली कंद व वन्यजीवांच्या मृगया चिन्हे हस्तगत करण्यात आले. यापैकी बहुतांश जप्त वन्य मृगयांना भारतीय वन अधिनियम १९७२ च्या शेड्यूल -१ मध्ये संरक्षण प्राप्त झालेले आहे. या गुन्हयाचे धागेदारे गुजराथ व तामिळनाडु राज्यांची जोडली असल्याची प्राथमिक प्राप्त झाली आहे. त्या अनुषंगाने वनविभाग पुढील तपास करत आहे.
Sea fans व Sea Black Corals हे बरेच लोकांकडून Good Luck Charm म्हणून अंध्दश्रध्देपोटी खरेदी केली जातात. तरी वन विभागाने असे आवाहन केले आहे. की अशा अंधश्रध्दांना बळी पडू नये अन्यथा याबाबत वन्यजीव अधिनियम १९७२ अंतर्गत कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. सदर कारवाई मनमाडचे सहायक वनसंरक्ष सुजित नेवसे, येवला वनपरिक्षेत्र अक्षय म्हेत्रे व वनविभागाच्या कर्मचा-यांनी केली.