नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवला तालुक्यातील ८३.२०० किमी लांबीच्या प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक ८०, ७९ व १७६ ची दर्जोन्नती होऊन या रस्त्यांना ‘राज्यमार्ग ५०७ क्रमांक प्राप्त झाला आहे. या निर्णयामुळे या रस्त्यांच्या विकासासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देखभाल दुरुस्ती तसेच विकासासाठी अधिक निधी प्राप्त होऊन रस्त्यांचा विकास होणार आहे. त्यामुळे नागरिकांचे दळणवळण अधिक सुलभ होणार आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५२ जी पासून नांदेसर -आडगाव – चौथवा – उंदरी वाडी -देवळाणे-खाम गाव – भुलेगाव – वाघाळ -भारम – खरवंडी -ममदापुर – राजापूर ते मनमाड राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५२ जी ला मिळणारा रस्ता या प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक ८०, ७९ व १७६ ची दर्जोन्नती होऊन या रस्त्यांना ‘राज्यमार्ग ५०७ क्रमांक प्राप्त झाला आहे. या रस्त्यांना आता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देखभाल दुरुस्ती, रुंदीकरण आणि देखभालीसाठी आवश्यक प्राधान्य दिले जाणार आहे.
या निर्णयामुळे शेतकरी, व्यावसायिक, व्यापारी, विद्यार्थ्यांना दळणवळणाच्या दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार आहेत. कृषी मालाची वाहतूक करण्यासाठी अधिक सुलभता येणार आहे.