सोमवार, ऑगस्ट 25, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

राज्यात पहिल्यांदाच येवल्यात दिव्यांग बांधवांना सर्वाधिक मोटार चलित ट्राय सायकलचे वाटप…

by Gautam Sancheti
मार्च 3, 2025 | 1:27 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20250303 WA0208

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून दिव्यांग बांधवांचे जीवन अधिक सुखकर करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अविरत प्रयत्न सुरू आहे. यापुढील काळातही हे काम सुरू राहील. मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिकांचे जीवन अधिक सुखकर करण्यासाठी येवल्यात प्रधानमंत्री दिव्याशा केंद्र सुरू करण्यात येईल असे प्रतिपादन माजी खासदार समीर भुजबळ यांनी केले.

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून आणि पावर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड सीएसआर योजनेंतर्गत भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम अलिम्को या संस्थेच्या वतीने येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातील दिव्यांग बांधवांकरिता मोटार चलित ट्राय सायकलचे मोफत वाटप माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. पैठणी पर्यटन केंद्र येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, उपाध्यक्ष दत्ता निकम, शहराध्यक्ष दीपक लोणारी, जलचिंतन सेलचे अध्यक्ष मोहन शेलार, प्रा.अर्जुन कोकाटे, अलिम्को कंपनीचे डॉ.किरण पावरा, डॉ.कमलेश यादव, मच्छिंद्र थोरात, मुश्ताक शेख, संतोष खैरनार, स्वीय सहायक बाळासाहेब लोखंडे, सरपंच श्री.निकम, बबनराव साळवे, समाधान जेजुरकर, सुनील पैठणकर, अशोक कुळधर, प्रवीण पहिलवान, भूषण लाघवे, विजय जेजुरकर, भाऊसाहेब धनवटे, संतोष जगदाळे, गोटू मांजरे, सुमित थोरात, विशाल परदेशी, संतोष राऊळ, महेश गादेकर, नितीन आहेर, गणेश गवळी, राकेश कुंभारे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी माजी खासदार समीर भुजबळ म्हणाले की, भारत सरकारच्या वतीने दिव्यांग बांधवांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांमुळे दिव्यांग बांधवांचे जीवन अधिक सुखकर होण्यास मदत होत आहे. शासनाच्या या सर्व योजनांचा लाभ दिव्यांग बांधवांना होण्यासाठी सातत्याने होण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल त्यामुळे शासनाच्या योजनांपासून कुणीही दिव्यांग वंचित राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, दिव्यांग बांधवांचे जीवन अधिक सुखकर होण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे अविरत प्रयत्न सुरू आहे. यापुढील काळात लवकरच प्रधानमंत्री दिव्याशा केंद्र येवला कार्यालयात सुरू करण्यात येईल. या केंद्राच्या माध्यमातून दर महिन्याला दोनशे ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करण्यात येऊन त्यांना आवश्यक ती साधने मोफत स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच दिव्यांग बांधवांसाठी देखील नियमित तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येऊन दिव्यांग बांधवांना आवश्यक असलेली सर्व मदत उपलब्ध करून देण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

यावेळी ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, अलिम्को कंपनीचे डॉ.कमलेश यादव यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक स्वाय सहायक बाळासाहेब लोखंडे यांनी केले. तर कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन संतोष खैरनार यांनी केले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

महाराष्ट्र में दो है गुंडे, कोकाटे – मुंडे – कोकाटे मुंडे! विरोधकांचे राजीनाम्यासाठी विधिमंडळ परिसरात आंदोलन

Next Post

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विधानपरिषद सभापती यांच्या दालनाचे उद्घाटन

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

निबंधक भागीदारी संस्था संकेतस्थळाचा शुभारंभ 1 2 1024x604 1
संमिश्र वार्ता

भागीदारी संस्था नोंदणीसाठी नवे संकेतस्थळ कार्यान्वित; आधुनिक सुविधा उपलब्ध होणार

ऑगस्ट 25, 2025
IMG 20250825 WA0292 1 e1756121671326
इतर

काठे गल्लीच्या विघ्नहर्ताचे ढोल ताश्यांच्या गजरात वाजत गाजत आगमन

ऑगस्ट 25, 2025
Nitesh Rane
संमिश्र वार्ता

देवेंद्र फडणवीसांच्या आईबद्दल अपशब्द….नितेश राणे यांनी मनोज जरांगेंना दिला हा इशारा….

ऑगस्ट 25, 2025
rape
क्राईम डायरी

अल्पवयीन मुली असुरक्षीत…वेगवेगळ्या दोन घटनेत बलात्कार व विनयभंगाचा गुन्हा दाखल

ऑगस्ट 25, 2025
Jitendra Awhad
संमिश्र वार्ता

अंतरिक्षात जाणारा पहिला व्यक्ती हनुमानजी…अनुराग ठाकुर यांचा व्हिडिओ शेअर करत जितेंद्र आव्हाड यांनी साधला निशाणा

ऑगस्ट 25, 2025
rohit pawar
संमिश्र वार्ता

रोहित पवार यांनी पुन्हा मंत्री संजय शिरसाटवर केला हा मोठा गंभीर आरोप….दिले १२ हजार पानांचे पुरावे

ऑगस्ट 25, 2025
प्रातिनिधीक फोटो
संमिश्र वार्ता

दहा वेळा पळून गेलेल्या विवाहित महिलेचा १५ दिवस पती व १५ दिवस प्रियकराबरोबर राहण्याचा प्रस्ताव….बघा, नेमकं काय घडलं

ऑगस्ट 25, 2025
anjali damaniya
महत्त्वाच्या बातम्या

९६ मद्य परवाने नेत्यांची कंपन्यांना?…अंजली दमानिया यांनी शासनाच्या धोरणावर केला हा सवाल

ऑगस्ट 25, 2025
Next Post
1 2 1024x683 1

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विधानपरिषद सभापती यांच्या दालनाचे उद्घाटन

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011