येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त येवला शहरात काढण्यात आलेल्या भव्य दिव्य मिरवणुकीचा शुभारंभ माजी खासदार समीर भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. येवला शहरातील पाटोळे गल्लीत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रथातील प्रतिमापुजन करत मिरवणुकीस शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी माजी खासदार समीर भुजबळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा व पुतळ्या पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन केले.
यावेळी आमदार किशोर दराडे, शिवसेनेचे संभाजी पवार, प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन, नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार आहेर, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, उपाध्यक्ष दत्ता निकम, शहराध्यक्ष दीपक लोणारी, माजी नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, भोलशेठ लोणारी, राजेंद्र लोणारी, भाजपचे पप्पू सस्कर, समीर समदडीया, धनंजय कुलकर्णी, आनंद शिंदे, दत्ता महाले, कैलास सोनवणे, समितीचे अध्यक्ष सुभाष पाटोळे,कार्याध्यक्ष युवराज पाटोळे, अविनाश कुक्कर, सुनील पैठणकर, भाऊसाहेब धनवटे, सुभाष गांगुर्डे, सचिन सोनवणे, शरद राऊळ, भूषण लाघवे, समाधान जेजुरकर, नागेश गवळी, विशाल परदेशी, सुमित थोरात, गोटू मांजरे, संतोष राऊळ, वाल्मीक कुमावत,सौरभ जगताप, श्रीकांत वाकचौरे, राकेश कुंभारे, यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वातंत्र्यवीर क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या प्रेरणेने स्वातंत्र्यपूर्व काळापासुनची येवला शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीची ऐतिहासिक परंपरा असून मोठ्या उत्साहात शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येतो. आज शिवजयंतीच्या निमित्ताने पाटोळे गल्लीतुन राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमापुजन होऊन भव्य मिरवणुकीची सुरूवात करण्यात आली. त्यानंतर पाटीलवाडा – मोठे महादेव मंदीर – काळा मारूती रोड – महाराणा प्रताप पुतळा –
आझाद चौक – देवी खुंट – टिळक मैदान – सराफ बाजार – मेनरोड -खांबेकर खुंट – इंद्रनील कॉर्नर येथून प्रस्थान करत येवला शहरात उभारण्यात आलेल्या शिवसृष्टी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करत मिरवणुकीचा समारोप झाला. याप्रसंगी मिरवणूक मार्गावरील महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले.
या मिरवणुकीमध्ये पारंपरिक ढोल पथक व लेझीम पथकाचा सहभाग होता. विविध ठिकाणी या पथकांनी प्रात्यक्षिकांचे सादरीकरण केले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा केलेल्या चिमुकल्यांनी मिरवणुकीचे लक्ष वेधून घेतले. या मिरवणुकीत विविध चित्ररथांचा देखील सहभाग होता.