मंगळवार, सप्टेंबर 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

मतदारसंघातील नागरिकांना विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय घेणार नाही…छगन भुजबळ

by Gautam Sancheti
डिसेंबर 17, 2024 | 6:55 pm
in संमिश्र वार्ता
0
IMG 20241217 WA0141 1 e1734441889659

येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- आपण शून्यातून लढा देऊन निर्माण करणारे लोक आहोत. त्यामुळे आपण पुन्हा लढू, हा लढा हा मंत्री पदाचा नाही तर हा लढा अस्मितेचा आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज येवला संपर्क कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेऊन संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार कल्याणराव पाटील, प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, ज्येष्ठ नेते तात्यासाहेब लहरे, विश्वासबापू आहेर, डी.के.जगताप, अरुणमामा थोरात, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, किसनकाका धनगे, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, जलचिंतन सेलचे अध्यक्ष मोहन शेलार, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, भाऊसाहेब भवर, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे, एल.जी.कदम, अर्जुन कोकाटे, डॉ.श्रीकांत आवारे, दिपक लोणारी, राजश्री पहिलवान,सुरेखा नागरे, प्रा.ज्ञानेश्वर दराडे, दत्ता निकम, बाळासाहेब गुंड, नवनाथ काळे, मच्छिंद्र थोरात, गणपत कांदळकर, विनायक भोरकडे, साहेबराव आहेर, विनोद जोशी, दत्तूपंत डुकरे, सचिन दरेकर, दत्ताकाका रायते, विलास गोरे, शिवाजी सुपणर, अशोक नागरे, संजय पगारे, सचिन कळमकर, कैलास सोनवणे, बालेश जाधव, डॉ.प्रवीण बुल्हे, तानाजी आंधळे, मलिक मेंबर, मतीन अन्सारी, पांडुरंग राऊत, सर्जेराव सावंत, डॉ.वैशाली पवार, अनिल सोनवणे, बबन शिंदे, अशोक संकलेचा, अल्केश कासलीवाल, सोहील मोमीन, संतोष खैरनार, भाऊसाहेब धनवटे, सुनील पैठणकर, भूषण लाघवे, सुभाष गांगुर्डे, सुमित थोरात, गोटू मांजरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, आपण अनेक मंत्री पदावर काम केलं आहे. गेली ४० वर्षांहून अधिक काळापासून आपण काम करतो आहोत. त्यामुळे हा प्रश्न मंत्री पदाचा नाही. आपला हा लढा अस्मितेचा लढा आहे. त्यामुळे सर्वांनी एकसंघ राहून काम करावे. मतदारसंघातील जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय आपण घेणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.

ते पुढे म्हणाले की, येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातील सर्व जनतेने विशेष मेहनत घेऊन मला पाचव्यांदा संधी दिली. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. मतदारसंघाच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन आपल्याला काम करायचे आहे. मांजरपाड्याच्या माध्यमातून येवल्याला अधिक पाणी देण्याचा शब्द आपण येवलेकराना दिला आहे. तो पुढील काळात आपल्याला पूर्ण करायचा आहे. मतदारसंघाच्या विकासासाठी आपण कटिबध्द असून विकासाची कामे अविरतपणे सुरू राहतील. येवला लासलगाव मतदारसंघ आपल्याला एकसंघ ठेवायचा आहे. आगामी काळात येवला मतदारसंघात सुरू असलेली विकासाची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात येतील असे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.

यावेळी ओबीसींच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावल्याने पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत आम्ही सदैव आपल्या सोबत असल्याच्या भावना यावेळी व्यक्त केल्या. तसेच भुजबळ साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है, ओबीसीची एकच चळवळ छगन भुजबळ छगन भुजबळ अशा विविध घोषणांनी कार्यालय परिसर दणाणून सोडला. तसेच माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना सन्मानपूर्वक मंत्रिमंडळात घ्या अशी मागणी उपस्थितांनी केली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

विधानपरिषद सभापती पदाची निवडणूक १९ डिसेंबरला…कोणाला मिळणार संधी

Next Post

महामेट्रो आणि आशियाई विकास बँक यांच्यात सामंजस्य करार; या मेट्रो प्रकल्पासाठी १५२७ कोटींचे अर्थसहाय्य

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

Maha Gov logo 07 1 1024x512 1
राज्य

या योजनेच्या उपचारांची संख्या १३५६ वरून २३९९ पर्यंत वाढविण्यात येणार….मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सप्टेंबर 15, 2025
Untitled 21
संमिश्र वार्ता

बीड पुरात भारतीय लष्करी दक्षिण कमांडच्या थार रॅप्टर्स विमानदलाची जलद बचाव मोहीम

सप्टेंबर 15, 2025
CM
संमिश्र वार्ता

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा या तारखेपासून शुभारंभ….

सप्टेंबर 15, 2025
Untitled 20
संमिश्र वार्ता

नाशिकमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचा आक्रोश मोर्चा…बघा, व्हिडिओ

सप्टेंबर 15, 2025
PETROL PUMP
संमिश्र वार्ता

टँकरमधून होणारी इंधन चोरी….पेट्रोल डीलर्स असोसिएशनने चोरीचा असा केला पर्दाफाश

सप्टेंबर 15, 2025
Untitled 19
स्थानिक बातम्या

नाशिकच्या केंब्रिज स्कूलमध्ये बॅाम्ब…शाळा प्रशासनाने दिली ही माहिती

सप्टेंबर 15, 2025
accident 11
क्राईम डायरी

नाशिकमध्ये वेगवेगळया अपघातात भरधाव वाहनांनी दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू

सप्टेंबर 15, 2025
SUPRIME COURT 1
महत्त्वाच्या बातम्या

वक्फ संशोधन कायद्याला आव्हान देणा-या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने दिला हा निकाल

सप्टेंबर 15, 2025
Next Post
1 01 870x420 1

महामेट्रो आणि आशियाई विकास बँक यांच्यात सामंजस्य करार; या मेट्रो प्रकल्पासाठी १५२७ कोटींचे अर्थसहाय्य

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011