बुधवार, ऑक्टोबर 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

मंत्री छगन भुजबळ यांना दीड लाखांच्या लीडने निवडून देऊ खेडलेझुंगे येथील प्रचार सभेत पदाधिकारी नेत्यांचा निर्धार….

नोव्हेंबर 6, 2024 | 4:24 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20241106 WA0155

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. या मतदारसंघात गेली वीस वर्ष भुजबळ पॅटर्न च्या माध्यमातून विकासाची कामे करत आहोत. त्यामुळे कुणी निंदा करा काहीही बोलले तर आपल्याला त्याच्याशी काही देणे घेणे नाही. केवळ मतदारसंघाचा विकास करणे हाच आपला एकमेव धंदा आहे. येणाऱ्या पुढील पाच वर्षांत मतदारसंघातील एकही नागरिक घरापासून वंचित राहणार नाही असे प्रतिपादन मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

येवला विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भाजप, शिवसेना,आरपीआय आठवले गट महायुती घटक पक्षातील अधिकृत उमेदवार मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रचाराचा शुभारंभ श्रीराम मंदिर खेडलेझुंगे येथे नारळ वाढवून करण्यात आला. यावेळी त्यांनी योगीराज तुकाराम बाबा यांच्या समाधीचेही दर्शन घेतले.

यावेळी माजी आमदार कल्याणराव पाटील, प्रदेश उपाध्यक्ष अंबादास बनकर, ज्येष्ठ नेते तात्यासाहेब लहरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, पंढरीनाथ थोरे, मायावती पगारे, भाजप जिल्हाध्यक्ष शंकर वाघ,अरुण थोरात,प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, डी.के.जगताप, प्रकाश दायमा, सुवर्णाताई जगताप, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब भवर, ज्येष्ठ नेते विश्वासराव आहेर, भाजप विधानसभा अध्यक्ष आनंद शिंदे, विनोद जोशी, कैलास सोनवणे, शेखर होळकर, डॉ.श्रीकांत आवारे, सचिन दराडे,मंगेश गवळी, शिवाजी सुपनर, दत्तूपंत डुकरे, सचिन दरेकर, अशोक घोटेकर, युवक जिल्हाध्यक्ष योगेश नीसाळ, महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, सुरेखा नागरे, भाऊसाहेब बोचरे, अशोक नागरे, दत्तात्रय रायते, बालेश जाधव, मच्छिंद्र थोरात, रामभाऊ जगताप,उन्मेष डुंबरे, मायाताई सदाफळ, बाळासाहेब गुंड, बाळासाहेब पुंड, विजय सदाफळ, प्रशांत घोटेकर, निलेश सालकाडे, माधव जगताप, बबन शिंदे, योगेश साबळे, रोहिदास जाधव, शरद जाधव,उदय आहेर, डॉ.वैशाली पवार, विलास गोरे, संपत डुंबरे, शिवनाथ सदाफळ, देविदास निकम, संतोष राजोळे, विलास गीते, पांडुरंग राऊत, सोहेल मोमीन यांच्यासह महायुती घटक पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

सभेच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर,राजमाता अहिल्यादेवी होळकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, वीर एकलव्य आणि गोपीनाथराव मुंढे या महापुरुषांच्या विचारांसमोर नतमस्तक होऊन त्यांच्या वंदनाने प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, जात धर्म पक्ष हे सर्व विकास हेच असून देशातील महापुरुष हे आपली दैवत आहे. या महापुरुषांनी जे विचार मांडले त्यांच्या विचारांवर आपण वाटचाल करतो आहे. या महापुरुषांनी सांगितलेल्या विचारांवर शासन काम करत आहे. शिक्षण, महिला सक्षमीकरण, वंचितांना न्याय देण्याचं काम महायुती सरकार करत आहे. महायुती सरकारने ज्या योजना सुरू केल्या आहे त्या योजना पुढेही नियमित सुरू ठेवण्याचं काम महायुती सरकार करेल असा विश्वास त्यांनी उपस्थितांना दिला.

लाडक्या बहिणींना देण्यात येणाऱ्या १५०० रुपयांच्या रकमेत वाढ करण्यात येईल. महिलांसाठी सुरू केलेली ही योजना काळ्या दगडावरील पांढरी रेष आहे. महायुती सरकारने प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी योजना आणल्या आहेत. महायुती सरकार या योजना नियमित सुरू ठेवतील असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, पिंपळस ते येवला, लासलगाव विंचूर ते खेडलेझुंगे, रुई फाटा ते खेडले झुंगे रस्ता, लासलगाव येथे अप्पर तहसील कार्यालय ही कामे पूर्ण केली जातील. येवल्याच्या सिंचनासाठी आपण केवळ मांजरपाडा प्रकल्पावर आपण थांबणार नाही. तर पुढे पार तापी गोदावरी लिंक योजनेतून अधिकचे ७ टीएमसी पाणी उपलब्ध होण्यासाठी पुढील काळात काम करून केवळ नाशिक जिल्हा नाही तर मराठवाड्याची तहान भागवू असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच गेली वीस वर्ष केवळ चर्चा, आश्वासने नाहीतर प्रत्यक्ष कामे केली असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.

राज्याच्या पर्यटन खात्याची जबाबदारी पार पाडत असताना राज्यातील धार्मिक पर्यटनाला चालना दिली. मतदारसंघातील अनेक धार्मिक स्थळांचा विकास केला आहे. पुढील काळात योगिराज तुकाराम बाबा मंदिर परिसराचा अधिक विकास केला जाईल. शिवसृष्टी प्रकल्पाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास आपण पुढे आणू. हा प्रकल्प पाहण्यासाठी केवळ महाराष्ट्र नाही तर देशभरातून नागरिक येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मंत्री छगन भुजबळ हे राज्याचे नेतृत्व आहे. राज्यातील प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाची गरज आहे. येवला मतदारसंघात त्यांनी केलेला विकास अख्खा महाराष्ट्र बघत आहे. त्यामुळे कुठल्याही प्रचाराला बळी न पडता विकासाला म्हणजेच मंत्री छगन भुजबळ यांना मत द्या असे आवाहन माजी आमदार कल्याणराव पाटील यांनी केले.

विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी आपल्या पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांना विक्रमी मतांनी निवडून द्यायचे आहे असे प्रदेश उपाध्यक्ष प्रचार प्रमुख अंबादास बनकर यांनी सांगितले.

येवला मतदारसंघाचे नेतृत्व करण्यासाठी मंत्री छगन भुजबळ आपल्या मतदारसंघात आले. गेली वीस वर्ष मतदारसंघात अनेक विकासाची कामे झाली. या सर्व कामाचे आपण साक्षीदार आहोत. सर्वाधिक निधी येवला मतदारसंघात आणला गेला आहे. मतदारसंघातील नागरिक हा विकास बघतो आहे. त्यामुळे कुठल्याही अपप्रचाराला मतदार बळी पडणार नाही. या मतदारसंघाच्या भविष्यातील विकासासाठी मंत्री छगन भुजबळ यांना प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी केले.

येवला मतदारसंघाच्या भविष्यासाठी छगन भुजबळ हे आपल्याला हवे आहेत. ते या आमदार होणे आणि मतदारसंघाला चांगलं खात मिळणे ही मतदारसंघाची गरज आहे. त्यामुळे जाती पातीच्या राजकारणाला बळी न पडता मतदारसंघातील नागरिकांनी मंत्री छगन भुजबळ यांना निवडून द्या असे आवाहन प्रकाश दायमा यांनी केले.

यावेळी ज्येष्ठ नेते तात्यासाहेब लहरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, भाऊसाहेब भवर, डॉ.श्रीकांत आवारे, शेखर होळकर, सुवर्णाताई जगताप, मंगेश गवळी, शिवाजी सुपनर, भाऊसाहेब बोचरे, अनिल सोनवणे, प्रशांत घोटेकर, धनंजय जोशी, निलेश सालकाडे यांनी मनोगत व्यक्त करत मंत्री छगन भुजबळ यांना विक्रमी मतांनी निवडून देण्याचा निर्धार व्यक्त केला.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मारहाण करीत महिलेचा विनयभंग…हात उसनवार पैशातून वाद

Next Post

पोलीस असल्याची बतावणी करीत तोतयांनी दुचाकीची तपासणी करण्याच्या बहाण्याने व्यावसायीकाच्या हॅण्ड बॅगेतील रोकड केली लंपास

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

महत्त्वाच्या बातम्या

केंद्राचे गिफ्ट! महाराष्ट्रात होणार हे दोन रेल्वेमार्ग

ऑक्टोबर 8, 2025
FB IMG 1755619676395 1024x634 1
महत्त्वाच्या बातम्या

असे आहे पॅकेज… शेतकऱ्यांना मिळणार एवढे पैसे, या सवलती… जाणून घ्या सविस्तर…

ऑक्टोबर 8, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
महत्त्वाच्या बातम्या

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्वाचे निर्णय

ऑक्टोबर 8, 2025
Untitled 31
मुख्य बातमी

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी इतक्या हजार कोटींचे पॅकेज

ऑक्टोबर 8, 2025
AirAsia e1678528968685
महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीच्या सणात विमान तिकीट दर वाढणार?

ऑक्टोबर 6, 2025
aadhar
महत्त्वाच्या बातम्या

लहान मुलांच्या आधार नोंदणीबाबत नवी घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
DRI1JPGDBUG
महत्त्वाच्या बातम्या

“ऑपरेशन डिजीस्क्रॅप” अंतर्गत झाली ही मोठी कारवाई

ऑक्टोबर 6, 2025
M 1024x768 1
महत्त्वाच्या बातम्या

साखर कारखान्यांबाबत अमित शाह यांनी केली ही घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
Next Post
crime 1111

पोलीस असल्याची बतावणी करीत तोतयांनी दुचाकीची तपासणी करण्याच्या बहाण्याने व्यावसायीकाच्या हॅण्ड बॅगेतील रोकड केली लंपास

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011