नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- कुठल्याही जातीपातीसाठी नव्हे तर येवला मतदारसंघात विकास हाच ध्यास घेऊन आपण आलो. आपली जात धर्म पंथ पक्ष हा विकास आहे. त्यामुळे गेल्या वीस वर्षात आपण मतदारसंघात अनेक विकासकामे केली. त्यामुळे जातीयतेचे विष या मतदारसंघात कधीही नव्हते कृपा करून ते विष पेरण्याचे काम विरोधकांनी करू नये अशी टीका मंत्री छगन भुजबळ यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना, आरपीआय आठवले गट महायुती घटक पक्षांचे अधिकृत उमेदवार छगन भुजबळ यांच्या प्रचाराचा शुभारंभ कोटमगाव देवीचे येथे नारळ फोडून करण्यात आला. यावेळी आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते.
यावेळी आमदार पंकज भुजबळ, माजी आमदार कल्याणराव पाटील, ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, तात्यासाहेब लहरे, अरुण थोरात, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, राधाकिसन सोनवणे, मायावती पगारे, डी.के.जगताप, माजी नगराध्यक्ष भोलाशेठ लोणारी, हुसेन शेख, बंडू क्षीरसागर, राजश्री पहिलवान, ज्येष्ठ नेते विश्वासराव आहेर, एल.जी कदम, माजी सभापती किसनकाका धनगे, जलचिंतन सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ.मोहन शेलार,
येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, भाऊसाहेब भवर, भाजपचे तालुकाध्यक्ष नानासाहेब लहरे, शिवसेनेचे किशोर सोनवणे, शहराध्यक्ष अतुल घटे, दीपक लोणारी,प्रा.अशोक घोडेराव, डॉ.श्रीकांत आवारे, कैलास सोनवणे, राजाभाऊ लोणारी, गुड्डू जावळे, दत्ता निकम, मच्छिंद्र थोरात, गोरख शेंद्रे, पप्पू सस्कर, कैलास सोनवणे, अशोक मेंगाणे, बाळासाहेब गुंड, नवनाथ काळे, समीर समदडिया, अशोक संकलेचा, शिवाजी सुपनर, गणपत कांदळकर, बाळासाहेब पुंड, दत्ता रायते, विनायक भोरकडे, निलेश सालकाडे, मलिक मेंबर, मकरंद सोनवणे, प्रा.ज्ञानेश्वर दराडे ,देविदास निकम, विनोद ठोंबरे,यांच्यासह महायुती घटक पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
सभेच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर,राजमाता अहिल्यादेवी होळकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, वीर एकलव्य आणि गोपीनाथराव मुंढे या महापुरुषांच्या विचारांसमोर नतमस्तक होऊन त्यांच्या वंदनाने प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, ज्या जगदंबा मातेच्या परिसरात आपण नारळ फोडले. तो परिसर विकासापासून दूर होता. आज या परिसराचा परिपूर्ण विकास झाला आहे. मतदारसंघातील अनेक तीर्थ स्थळांचा विकास आपण केला असून आगामी काळात ७५ कोटींचा आराखडा मंजूर करून येथे विकासकामे करण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले.
ते म्हणाले की, येवला मुक्तिभूमीचा दोन टप्प्यात ३० कोटींहून अधिक निधी खर्च करून परिसराचा विकास केला आहे. आज जगभरातून लोक याठिकाणी अभिवादन करण्यासाठी येत आहे. त्याचबरोबर तात्या टोपे स्मारक, अहिल्याबाई होळकर घाटाची निर्मिती, बोट क्लब, क्रीडा संकुल, येवला उपजिल्हा रुग्णालय, लासलगाव उपजिल्हा रुग्णालय भव्य दिव्य शिवसृष्टी साकारण्यात आली आहे. पुढे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, भगवान एकलव्य स्मारकाचे कामे मंजूर असून निवडणुकीनंतर ही कामे सुरू होतील असे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या, १७ एकर परिसरात प्रशासकीय संकुल उभारण्यात आले. हे देशासाठी मॉडेल ठरले आहे. येवला मतदारसंघात आपण हा विकास करू शकलो याचा आनंद आपल्याला आहे. मात्र काही लोक ही इमारती बांधून विकास होत नाही अशी टीका करतात. त्यांनी मतदारसंघात झालेल्या पायाभूत सुविधा विकास बघवा अशी टीका विरोधकांवर त्यांनी केली.
ते म्हणाले की, मतदारसंघाला सुजलाम सुफलाम करण्यासाठी मांजरपाडा प्रकल्प साकारण्यात आला आहे. या प्रकल्पाचे पाणी डोंगरगाव पर्यंत पोहचावे यासाठी संपूर्ण कालव्याचे अस्तरीकरण करण्यात येत आहे. यंदा ९० टक्के काम पूर्ण झाले असून यंदाच्या पावसाळ्यात दोनदा पाणी डोंगरगाव पर्यंत आले. आपण केवळ यावर थांबणार नाही. पार गोदावरी प्रकल्पाच्या माध्यमातून अधिक पाणी आपण आगामी काळात आणू. या पाण्याने केवळ येवला नाही तर मराठवाड्याची तहान भागवली जाईल असे त्यांनी सांगितले.
यावेळी माजी आमदार कल्याणराव पाटील म्हणाले की, येवला मतदारसंघाची निवडणूक ही आरक्षणाची नाही तर विकासाची निवडणूक आहे. त्यामुळे स्वार्थासाठी जे लोक राजकारण करताय त्यांना थारा देऊ नये. विकास ही न थांबणारी प्रक्रिया असून मतदारसंघाच्या भविष्यातील विकासासाठी कणखर अनुभवी भुजबळ साहेबाना प्रचंड मतांनी विजयी करायचे असल्याचे त्यांनी सांगितले.
मंत्री छगन भुजबळ यांनी इतकी विकासाची कामे झाली आहे की ती एका दमात सांगणे कठीण आहे. त्यामुळे विरोधक अपप्रचार करून आपला स्वार्थ साधण्याच्या प्रयत्न करत आहे. मतदारसंघात पिण्याच्या पाण्याच्या अनेक योजना राबविल्याने आज महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरला आहे. त्यामुळे सर्वांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी असून ते प्रचंड मतांनी निवडून येतील असा विश्वास प्रदेश उपाध्यक्ष अंबादास बनकर यांनी व्यक्त केला.
मंत्री छगन भुजबळ यांनी अनेक विकासाची कामे मतदारसंघात केली आहे. यंदाच्या निवडणुकीत त्यांना लाखाच्या विक्रमी मतांनी आपल्याला निवडून द्यायचे आहे. यासाठी बेचाळीसगाव परिसर हा पुढे राहील असा विश्वास माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पंढरीनाथ थोरे यांनी व्यक्त केला.
इमारती बांधून विकास होत नाही असे म्हणणे योग्य नाही. मतदारसंघात अनेक इमारती उभ्या राहिल्याने खऱ्या विकासाला चालना मिळाली आहे. काही लोक जाती पातीच राजकारण करू पाहता आहे. त्याला आपण बळी न पडता विकास पुरुष छगन भुजबळ यांना प्रचंड मतांनी निवडून द्या असे आवाहन ज्येष्ठ नेते तात्यासाहेब लहरे यांनी सांगितले.
यावेळी भाऊसाहेब भवर, माजी नगराध्यक्ष हुसेन शेख, प्रा .अशोक घोडेराव, डॉ.मोहन शेलार, शिवसेनेचे किशोर सोनवणे, माजी नगराध्यक्ष भोलाशेठ लोणारी, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, अशोक घोडराव, पप्पू सस्कर, डॉ.श्रीकांत आवारे, भाजपचे तालुकाध्यक्ष नानासाहेब लहरे, संजय पगारे, अशोक संकलेचा, शिवाजी सुपनर, विनायक भोरकडे यांनी मनोगत व्यक्त करत विक्रमी मतांनी मंत्री छगन भुजबळ यांना निवडून आणू असा विश्वास यावेळी व्यक्त केला. देविदास निकम, विनोद ठोंबरे यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला.
ब्लॅक टायगर फोर्स, एकलव्य संघटनेचा जाहीर पाठिंबा
येवला विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार मंत्री छगन भुजबळ यांनी गेल्या वीस वर्षात हजारो कोटी रुपयांची विकासकामे करून येवल्याच्या चेहरा मोहरा बदलला आहे. यापुढील काळातही त्यांच्या हातून विविध विकासकामे मतदारसंघात होतील यासाठी आदिवासी ब्लॅक टायगर फोर्स आणि एकलव्य संघटनेच्या वतीने मंत्री छगन भुजबळ यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला.