येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दरवर्षी दसऱ्याच्या निमित्ताने येवलेकरांना एकत्रित आनंद उत्सव साजरा करण्यासाठी येवला शिवसृष्टी प्रकल्पात फायर शोचे आयोजन करण्यात येईल असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या संकल्पनेतून दसऱ्याच्या निमित्ताने शिवसृष्टी प्रकल्पात आयोजित फायर शोला येवलेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठी गर्दी केली. या फायर शोच्या माध्यमातून येवलेकरांनी नयनरम्य सोहळा अनुभवला. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थितांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे मुंबई अध्यक्ष तथा माजी खासदार समीर भुजबळ, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, ज्येष्ठ नेते अरुण थोरात, माजी नगराध्यक्ष हुसेन शेख, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, जलचिंतन सेलचे अध्यक्ष मोहन शेलार, शहराध्यक्ष दीपक लोणारी, समाधान जेजुरकर, प्रा. ज्ञानेश्वर दराडे, नितीन गायकवाड, भगवान ठोंबरे, अल्केश कासलीवाल, मलिक मेंबर, मुश्ताक शेख, गोटू मांजरे, भूषण लाघवे, सचिन सोनवणे, सुभाष गांगुर्डे, दीपक गायकवाड, विशाल परदेशी, महेश गादेकर, सुनील पैठणकर, भाऊसाहेब धनवटे, संतोष खैरनार, सुमित थोरात, संतोष राऊळ, गणेश गवळी यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते व येवलेकर बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याच्या संकल्पनेवर आधारित शिवसृष्टी प्रकल्प आपण उभा केला आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण झाल्यानंतर लाखो नागरिकांनी लाखो नागरिकांनी शिवसृष्टी प्रकल्पास भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले. येवले करांना दसऱ्याच्या निमित्ताने एकत्रित आनंद उत्सव साजरा करण्यासाठी दरवर्षी या शिवसृष्टी प्रकल्पामध्ये फायर शोचे आयोजन करण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले.
राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या संकल्पनेतून येवला शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराजाच्या संकल्पनेवर आधारित भव्य दिव्य शिवसृष्टी प्रकल्प साकारण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे नुकतेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. हा शिवसृष्टी प्रकल्प पाहण्यासाठी शिवप्रेमी मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहे. या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्याच्या कामाला सुरवात करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर दसऱ्याचे औचित्य साधत मंत्री छगन भुजबळ यांनी येवलेकरांसाठी विशेष फायर शोचे आयोजन केले होते. या फायर शो ला येवलेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत नयनरम्य सोहळा अनुभवला.