मंगळवार, जुलै 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणावर शिवसेनेचे आमदार किशोर दराडे यांची नियुक्ती

by India Darpan
सप्टेंबर 29, 2024 | 7:17 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20240929 WA0245 2 e1727617598903

येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणावर शिवसेनेचे विधानपरिषद सदस्य किशोर दराडे यांची नामनिर्देशित सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.या सोबतच नाशिक शहरातील भाजप-राष्ट्रवादीच्या चारही आमदारांचा या समितीत समावेश करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार या समितीवर शासन नियुक्त सदस्यपदी आमदार दराडे यांची वर्णी लागली आहे.नुकतेच नाशिक शिक्षक मतदारसंघातून विजयी झालेले दराडे हे शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्न मार्गी लावून शिक्षकांमध्ये लोकप्रिय आहेतच. मात्र येवला नगरपालिका कार्यक्षेत्रात त्यांनी कोट्यावधीची कामे मार्गी लावली आहे. जनहिताची कामे करण्याची आवड असल्याने या समितीवर त्यांची वर्णी लागली आहे.

नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची २००८ पासून सुरुवात केली आहे. नाशिक शहराचा झपाट्याने विकास होत असल्याने शहराला लागून असलेला तालुका परिसरात देखील व्यवसाय वाढत असल्याने व्यावसायिकांना मुलभूत सुविधा मिळण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालय सुरू करण्यात आले. या कार्यालयाच्या माध्यमातून विकासकामांसाठी निधीची उपलब्धता, पायाभूत सुविधांचा विकास, विकासाचे नियोजन, गुंतवणुकीला प्राधान्य देण्याचा हा उद्देश आहे.नाशिक महानगरला लागून असलेल्या सिन्नर, इगतपुरी, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर आणि निफाड या तालुक्यातील २७५ गावांचा समावेश आहे.

नगरविकास विभागाने २१ ऑगस्ट, २००८ च्या अधिसूचनेव्दारे नाशिक महानगर क्षेत्र म्हणून घोषित केले असून १ मार्च २०१७ च्या अधिसूचनेद्वारे नाशिक महानगर क्षेत्रासाठी नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची स्थापन करण्यात आलेली आहे. या प्राधिकरणावर आमदार राहुल ढिकले,सिमा हिरे,देवयानी फरांदे,सरोज अहिरे या विधानसभा सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. सोबतच दराडे यांचाही या समितीत समावेश करण्यात आला आहे.

दरम्यान,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे मला हा काम करण्याची संधी मिळणार असून प्राधिकरणाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करण्यासह रखडलेल्या कामांना चालना देण्यासाठी काम करेल.यासाठी शासनाकडे ठोस पाठपुरावा करेल अशी प्रतिक्रिया दराडे यांनी नियुक्तीनंतर व्यक्त केली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या विकास कामांचे ऑनलाईन लोकार्पण आणि भूमिपूजन…

Next Post

ऑरीक बिडकीन औद्योगिक प्रकल्पाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण

India Darpan

Next Post
pm csn 908x420 1

ऑरीक बिडकीन औद्योगिक प्रकल्पाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011