येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या संकल्पनेवर आधारित भव्य दिव्य शिवसृष्टी प्रकल्प साकारण्यात येत आहे. या प्रकल्पातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा संपूर्ण इतिहास आपल्यासमोर मांडला जाणार आहे. दि.२ ऑक्टोबर २०२४ रोजी या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण होणार आहे असे सांगत ये तो सिर्फ झाकी है अभी बहोत कूछ देखना बाकी है असे प्रतिपादन राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज केले.
राज्याचे अन्न, नगरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराजाच्या संकल्पनेवर आधारित भव्य शिवसृष्टी प्रकल्प येवला शहरात ४.५ एकर जागेवर साकारण्यात येत आहे. या प्रकल्पात बसविण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिष्टीत पुतळ्याचे अंगणगाव ते शिवसृष्टी पर्यंत भव्य मिरवणुकीद्वारे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे येवला अंगणगाव येथे आगमन होताच. एनसीसीच्या शालेय विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास सलामी देत मिरवणुकीस सुरुवात झाली. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करत पुतळ्यास २१ तोफांची सलामी देखील देण्यात आली.
यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ, ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, जिल्हाध्यक्ष ऍड.रविंद्र पगार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, ज्येष्ठ नेते अरुण थोरात, विश्वास बापू आहेर, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, जलचिंतन सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ.मोहन शेलार, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, भाऊसाहेब भवर, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे, माजी नगराध्यक्ष हुसेन शेख, दत्ता निकम, बंडू क्षीरसागर, शहराध्यक्ष दिपक लोणारी, बाजारसमितीचे माजी सभापती किसनकाका धनगे, बाजार समितीचे संचालक ज्ञानेश्वर जगताप,डॉ.श्रीकांत आवारे, राजेंद्र लोणारी,डॉ.शेफाली भुजबळ, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, युवक जिल्हाध्यक्ष योगेश निसाळ,समाधान जेजुरकर, पूजा आहेर, राजश्री पहिलवान, सुरेखा नागरे, बाळासाहेब गुंड, नवनाथ काळे, प्रा.ज्ञानेश्वर दराडे, मेघा दराडे, सरपंच बाळासाहेब पुंड, सचिन दरेकर, भाऊसाहेब बोचरे, विनोद जोशी, शिवाजी सुपनर, अमजद शेख, मुश्ताक शेख, अल्केश कासलीवाल, प्रवीण पहिलवान, नितीन गायकवाड, मकरंद सोनवणे,विलास गोरे, मंगेश गवळी, दत्ताकाका रायते,पांडुरंग राऊत,अशोक नागरे, मच्छिंद्र थोरात, कैलास सोनवणे, डॉ.प्रवीण बुल्हे,भगवान ठोंबरे, इस्माईल मोमीन, मलिक मेंबर, गोरख शिंदे, जयंत साळी, निलेश सालकाडे, आनंद शिंदे, आतुल घटे, धीरज परदेशी, प्रमोद सस्कर, बबन शिंदे, सोहेल मोमीन, सुमित थोरात, पुंडलिक होंडे, रावसाहेब आहेर, राजू रोकडे, बाळासाहेब पिंपरकर, अशोक मेंगाने, अंबादास शिनकर, तुळशीराम कोकाटे, निलेश महाले, संतोष राजगुरू, साहेबराव आहेर, दिपक गायकवाड, गोटू मांजरे, विकी बिवाल, महेश गादेकर,नवनाथ थोरात,विजय जेजूरकर, सचिन सोनवणे, भूषण लाघवे, अविनाश कुक्कर, सुनील पैठणकर, संतोष खैरनार यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, आज छत्रपती शिवाजी महाराज यांचे येवला शहरात आगमन होताना आम्ही सर्व भरावून गेलो आहे. या सोहळाप्रसंगी डोळ्यात आनंदाचे अश्रू आहे. येवला लासलगाव मतदारसंघातील नागरिक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची वाट पाहत होते. अखेर आज तो दिवस उजाडला असून लवकरच हा भव्य दिव्य शिवसृष्टी प्रकल्प येवला लासलगाव मतदार संघातील नागरिकांसाठी खुला होईल असे त्यांनी सांगितले. ये तो सिर्फ झाकी है अभी अंदर तो बहुत कुछ देखना बाकी है असे ते म्हणाले.
ते म्हणाले की, येवला शिवसृष्टी प्रकल्पात रायगडाची प्रतिकृती तयार करण्याचा आपला प्रयत्न आहे. हे काम एक दोन महिन्याचे नाही. जागेची उपलब्धता,प्रकल्पाला मंजुरी, निधी, प्रकल्पाची आखणी महाराजांचा दरबार उभा करणे यात मोठा कालावधी लागला.राजस्थान येथील शेकडो कामगार आणि कार्यकर्ते रात्रंदिवस राबत आहेत. दिल्लीतील महाराष्ट्र सदन, महाराष्ट्राचे विधिमंडळ याप्रमाणे येवल्याच्या शिवसृष्टी प्रकल्पात छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनाधिष्टित पुतळा बसविण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, येवला शिवसृष्टी मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्याचा प्रत्येक घटक जनतेसमोर यावा अशी संकल्पना माजी खासदार समीर भुजबळ यांनी मांडली आणि त्यातून हा प्रकल्प उभा राहत आहे. यामध्ये महाराजांचे सरदार आणि मावळे यांचे शिल्प त्यांचा इतिहास कार्य यातून सर्वांना बघायला मिळतील.
ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास शिवसृष्टीच्या माध्यमातून बघायला मिळेल. काही लोक इतिहास बदलण्याचा प्रयत्न करतात. मात्र हा इतिहास पुसला जाणार नाही. आपण जाती पाती बाजूला ठेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्वराज्य स्वप्न आपल्याला सर्वांना सोबत येऊन निर्माण करायचे असल्याचे त्यांनी सांगितले.
३१ कला पथकांच्या सादरीकरणाने वेधले लक्ष*
येवला शहरात काढण्यात आलेल्या या मिरवणुकीत येवला शहर व तालुक्यातील आत्मा मलिक गुरुकुल, मायबोली विद्यालय, स्वामी विवेकानंद विद्यालय,अॅग्लो उर्दू गर्ल्स हायस्कूल, स्वामी मुक्तानंद विद्यालय, मातोश्री शांताबाई इंग्लिश स्कूल, जनता विद्यालय येवला, जनता विद्यालय जळगाव नेउर, जनता विद्यालय मुखेड, साईनाथ इंग्लिश स्कूल, धुळगाव, एन्झोकेम हायस्कूल या विद्यालयातील लेझीम पथकांनी सहभाग नोंदविला.
त्याचप्रमाणे बँड पथक, संभळ, डीजे,घोडा बग्गी, पेशवाई ग्रुप, शिवकालीन ग्रुप, ढोल पथक, आदिवासी पथक, पारंपारिक वेशभूषा पथक, साहसी क्रीडा पथक, लाठी काठी मर्दानी खेळ, घोडे, हलकडी,दांडपट्टा पथक, आदिवासी सांस्कृतिक नृत्य पथक यासह विविध ठिकाणच्या बँड पथकांचा मिरवणुकीत सहभाग होता. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा बाजूने फटाक्यांची आतषबाजी करत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर पुष्प वर्षाव करण्यात आला. तसेच क्रेनच्या सहायाने भव्य हार देखील महाराजांच्या पुतळ्यास अर्पण करण्यात आला.
पुतळ्याचे जल्लोषात स्वागत*
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिष्टीत पुतळ्याचे नाशिक मधून जल्लोषात प्रस्थान झाल्यानंतर निफाड शहर, तसेच येवला मतदारसंघात निफाड तालुक्यातील बोकडदरे, सुभाष नगर, विंचूर, हनुमाननगर, भरवस फाटा तसेच येवला तालुक्यातील देशमाने, जळगाव नेउर, एरंडगाव, अंगणगाव येथे फटाक्यांची आतषबाजी, ढोलताशांच्या गजरात फुलांची उधळण करत जल्लोषात स्वागत करण्यात आले.
मुस्लिम बांधवांकडून स्वागत
नाशिक येथून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे येवल्याकडे प्रस्थान झाल्यानंतर विविध ठिकाणी पुतळ्याचे जल्लोषास स्वागत करण्यात आले. यावेळी मुस्लिम बांधवांच्या वतीने पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत पुष्पवृष्टी करून जल्लोषात स्वागत करण्यात आले.
येवला शिवसृष्टी प्रकल्पात या कामांचा असणार समावेश…..
येवला शहरात करण्यात येत असलेल्या या शिवसृष्टी प्रकल्पात श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा १२ फुट उंचीचा ब्राँझ धातूचा पूर्णाकृती सिंहासनाधिष्टीत पुतळा, महाराजांच्या जीवनातील महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना आणि महाराजांचे सेनापती यांचे भित्त्तीचित्रे व शिल्प, शिवकालीन शस्त्रास्त्रांचे आणि पुस्तकांचे प्रदर्शन, शिवकालीन इतिहासाची माहिती देण्यासाठी ऑडीओ व्हिज्युअल हॉल, किल्ल्यांच्या प्रतिकृती असलेले मुख्य प्रवेशद्वार, सुरेख गार्डन आणि नयनरम्य कारंजे यासह विविध कामांचा समावेश आहे.