येवला (इंडिया दर्पण वृत्तेसवा) – विजेचा शॉक लागून ग्रामपंचायत कर्मचा-याचा दुर्दैवी मृत्यू झाला. येवला तालुक्यातील राहूरी ग्रामपंचायतचे शिपाई ज्ञानेश्वर गायकवाड हे ग्रामपंचायत कामासाठी राहाडी धरणाजवळील महावितरणच्या ११ केव्ही कट पॉईंट जवळ गेले असता स्विच स्वीच चालू बंद करीत असतांना स्वीच मध्ये करंट उतरलेले असल्याने विजेचा शॉक लागून त्यांना जोरदार शॉक लागल्याने त्यांचा मृत्यू झाला.
ही घटना परिसरात समजताच त्यांना येवला येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्रामपंचायत संघटनेने घटनेला जबाबादार असलेल्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी येवला तालुका पोलिस अधिक तपास करीत आहे.