येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– दरसवाडी पुणेगाव पोहोच कालव्याच्या माध्यमातून आज येवला तालुक्यातील कातरणी येथे पाणी पोहोचले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, ज्येष्ठ नेते अंबादास बनकर यांच्या हस्ते गावकऱ्यांच्या उपस्थितीत फटाक्यांची आतषबाजी गुलालाची उधळण करत पाण्याचे जलपूजन करण्यात आले. यावेळी शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण होते.
यावेळी विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे, पाणी आंदोलक मोहन शेलार,दत्ता निकम,अलकेश कासलीवाल, एल.जी.कदम, बाळासाहेब गुंड ,नवनाथ काळे,मच्छिंद्र थोरात, तुळशीराम कोकाटे, मकरंद सोनवणे,शिवाजी कदम, समाधान कदम, पप्पू सोनवणे, दिपक कदम, प्रवीण कदम, दत्तू लभडे, गोकुळ शिंदे, सचिन कदम, बापू सोनवणे, विनायक कदम, नामदेव पगार, विठ्ठल कदम,भगवान ठोंबरे, संतोष खैरनार, सचिन सोनवणे, सुमित थोरात, गोटू मांजरे, विजय जेजुकर,कैलास जेजूरकर,नवनाथ थोरात,दिपक गायकवाड, दिपक पवार,संदीप कदम, सुनील पैठणकर, भाऊसाहेब धनवटे, ऍड.मंगेश जाधव, गणेश गवळी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
येवल्याला जलसंजीवनी देण्याच्या दृष्टीने राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून मांजरपाडा देवसाने हा अतिशय महत्वपूर्ण प्रकल्प साकारण्यात आला आहे. या प्रकल्पातून येणारे पाणी येवल्याला पोहोचविण्यासाठी संपूर्ण कालव्याचे अस्तरीकरण करण्यात येत आहे. काल दरसवाडी धरणातून ओव्हर फ्लोचे पाणी सोडल्यानंतर केवळ १५ तासात आज हे पाणी येवला तालुक्यातील कातरणी शिवारात पोहोचले. पाणी कातरणी शिवारात पोहोचताच तीन पिढ्यांची स्वप्न पूर्ती होत असल्याने शेतकऱ्यांनी गुलालाची उधळण करून फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, ज्येष्ठ अंबादास बनकर यांच्या हस्ते स्थानिक गावकऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत जलपूजन करण्यात आले. यावेळी एकमेकांना पेढे भरवत शेतकऱ्यांनी आनंद उत्सव साजरा केला. तसेच शेतकऱ्यांनी यावेळी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांचे विशेष आभार मानले.