येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- तालुका परिसरामध्ये अनेक दिवसांपासून मोटरसायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. या अनुषंगाने नाशिक जिल्हा पोलीस प्रमुख विक्रम देशमाने यांनी या चोरट्यांचा छडा लावण्याचे आदेश पोलिसांना दिले होते.
त्यानुसार तालुका पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांच्या पथकाने कसून तपास करत येवला तालुक्यातील रितेश विजय मोरे राहणार सायगाव तसेच रवींद्र त्रंबक गोरे राहणार गवंडगाव या दोघा मोटरसायकल चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या व त्यांच्या ताब्यातील एकूण चार गुन्ह्यांमध्ये आठ मोटरसायकल हस्तगत करण्यात आले असून सदरच्या मोटरसायकल या लासलगाव निफाड,येवला, वैजापूर या परिसरामधून चोरण्यात आल्याची कबुली चोरट्यांनी दिली आहे.