येवला – येवला तालुक्यातील राजापूर येथे एसटी व कार यांच्यात समोरासमोर धडक झाली. या अपघातात कार व बसमधील चार जण जखमी झाले असून एक गंभीर आहे. या सर्वांना उपचारासाठी येवला येथे हलविण्यात आले आहे. नांदगाव आगाराची परळी बीड नांदगाव ही येवल्याकडून नांदगाव कडे जात असतांना हा अपघात झाला. एसटी व नांदगावकडून येणारी अल्टो कार यांच्यात समोरासमोर आल्यामुळे हा अपघात झाला. यात अल्टो मधील दोन जण तर येवला एसटी आगारात नोकरीला असलेले एक कर्मचारी जखमी आहे.