येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – डी फार्मसी कॉलेजला अॅडमिशन करून देतो असे सांगूनदीड लाख रुपये घेऊन त्याचे अॅडमिशन न करता फसवणूक विद्यार्थ्याची फसवणूक करणा-याला पोलिसांनी बंगळुरू येथून अटक केली आहे.
येवला शहरातील विद्यार्थी जाकिर अब्दुल रहमान शहा कचेरीरोड येवला याला डी फार्मसी कॉलेजला अॅडमिशन करून देतो असे सांगून त्याच्याकडून मुरशद अली उर्फ पाशा हसन दीड लाख रुपये घेतले होते. पण, त्याचे अॅडमिशन न करता फसवणूक केल्याबद्दल येवला शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर येवला शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सुरुज मेढे, पोलीस कॉन्स्टेबल दीपक शिरूड, बाबा पवार पोलीस कॉन्स्टेबल समीना शेख यांनी अत्यंत शिताफीने बंगळुरू शहरात सापळा रचून मुरशद अली उर्फ पाशा हसन याला ताब्यात घेतले. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण शिवाजी उमाप, अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड समीर सिंग साळवे, यांचे मार्गदर्शनाखाली एपीआय नितीन खडांगळे सूचनाप्रमाणे पीएसआय सुरज मेढे, पोलीस हवालदार दीपक शिरूर, पोलीस कॉन्स्टेबल बाबा पवार, कॉन्स्टेबल सुमय्या शेख यांनी कामगिरी बजावली आहे. अशी कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी पोलिसांना कळवावे असे आवाहन करण्यात आले आहे.