येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येवला- मनमाड राज्यमहामार्गावर सायंकाळी मोठी दुर्घटना घडली. कोपरगावकडून येवला शहरातील विंचूर चौफुली जवळ भरधाव येणा-या एका कंटेनर चालकाने रस्त्यावरील अनेक दुचाकीसह अन्य गाड्यांना धडक दिली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले आहे. आज येवला शहराचा आठवडे बाजार असल्याने या मार्गावर मोठी गर्दी असते. रस्त्यावरच अनेक वाहने थांबत असल्याने भरधाव आलेल्या कंटेनेर चालकाचा स्वता:वरील ताबा सुटल्याने ही दुर्देवी घटना घडली. कंटेनर चालक मात्र पळून गेला. त्याला मनमाडकडे जात असतांना पकडण्यात आले. तो दारुच्या नशेत असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे महामार्गावरील रस्त्यात असलेल्या अतिक्रमणांचा विषय पुढे आला आहे.
कंटनेर पलटी
या कंटनेर चालकाने मनमाडकडे जात असताना रस्त्यात आणखी दोघांना उडवले. अंकाईच्या विसापूर फाट्याजवळ कॅटेनर रस्त्याच्या कडेला पलटी झाला. पोलिसांनी कंटेनर चालक या ठिकाणी ताब्यात घेतले आहे.