येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येवला – मनमाड रोड वरील पटणी कॉम्प्लेक्स मधील नागरे ऑटोमोबाईल्स दुकानाला आग लागल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याच बोलले जात आहे. दुकानाला आग लागल्याची माहिती मिळताच येवला नगर परिषदेचा अग्निशामक बंब घटनास्थळी पोहचला. मात्र तोपर्यंत दुकानातील सर्व सामान जळून खाक झाले. अखेर तासाभराच्या प्रयत्नानंतर आग विझविण्यात यश आले.