येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात मकर संक्रांतीचा सण जवळ येऊन ठेपलेला असतांना अजून ही शहरात नायलॉन मांजाचा सर्रास वापर होत आहे. नायलॉन मांज्यामुळे रविवारी गळा कापल्याची घटना घडल्यावर दुपारी तहसीलच्या पुढील कॉर्नरला वाय पॉईंटवर प्रवीण खंडागळे व त्यांच्या दोन लहान मुली पृथ्वी खडांगळे व भूमी खडांगळे मोटर सायकल वर जात असतांना एकाच्या हाताला बोटांना तर दुसरीच्या गालाला नायलॉनमांजामुळे गंभीर दुखापत झाली आहे. अनेक घटना घडत असतांना पोलीस प्रशासन व नागरपालिका प्रशासन यांनी कडक मोहीम राबविने गरजेचे आहे. उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले.