येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील कोटमगावरोड बायपास येथून दुचाकीवर जात असलेल्या रितेश मुथा या व्यक्तीच्या गळ्यावर नायलॉन मांजा आल्याने त्याच ते जखमी झाल्याची घटना घडली. त्यांना तातडीने वेळीच खासगी रुग्णालयात दाखल करण्यात येऊन त्यांच्यावर उपचार करण्यात आले.नायलॉन मांज्याच्या विक्रेत्यांवर छापे टाकून मोठ्या प्रमाणावर मांज्या जप्त करण्यात आलेला असतांना सुध्दा या घातक मांज्याचा वापर येवल्यात होत असल्याच या घटनेवरुन समोर आले आहे,