येवला – येवला तालुक्यातील नगरसूल येथे पेट्रोलियम पेट्रोल पंपावर डिझेल भरत असतांना टाटा सफारी गाडीने अचानक पेट घेतला. पण, प्रसंगावधान राखत पेट्रोलपंपाच्या कर्मचा-यांनी गाडी लोटत थांब नेल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. गाडीतील वायरिंगमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे बोलले जात आहे. फायर बॉटल,वाळू बकेट, पाणी ओतून ही आग आटोक्यात आणण्यात आली. यात सुदैवाने कोणतीही पेट्रोलपंपाची हानी झाली नाही. या टाटा सफारीचा नंबर क्र.MH 14 EU 4785 ही गाडी पिंपळखुटे येथील असल्याचे समजते.