येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील नगरसूल शिवारात खजुरे वस्तीवर सीमा वैभव खजुरे (२२) आणि तिचा मुलगा गोळ्या वैभव खजुरे (२) या दोघा मायलेकाचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या महिलेने अज्ञात कारणाहून आपल्या लेकरासह आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत एकनाथ भिसे पोलीस हवालदार ठोंबरे आदींनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर सुरुवातीला बाळाचा मृतदेह व नंतर आईचा मृतदेह पाण्याबाहेर काढला आला. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालय येवला येथे पाठवण्यात आले आहे. या घटनेचा पुढील तपास येवला तालुका पोलीस करत आहे