येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील साईबाबा मंदिर परिसरातील दिनेश सरोदे या ३३ वर्षीय पैठणी विणकर तरुणाने घरातील छताच्या पाईपलाईनला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. दिनेश याच्या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही. पोलिसांनी पंचनामा करत शव विच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला असून येवला शहर याबाबत अधिक तपास करीत आहे.