येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येवला वनविभागात वनरक्षक म्हणून कार्यरत असणारे गोपाल प्रकाश राठोड यांची महागडी पल्सर मोटरसायकल घराजवळ लावलेली असतांना अज्ञात चौघा चोरट्यांनी गाडीचे लॉक तोडून पळवून नेल्याची घटना काल मध्यरात्रीच्या सुमारास घडली असून चोरीची सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. पोलिस अधिक तपास करीत आहे.