येवला – येवला तालुक्यातील विसापूर अनकाई फाटा येथे अवकाळी पाऊस पडत असताना रस्त्याच्या कडेला झाडाखाली आडोशाला उभे असलेल्या तिघा नागरिकांवर अचानक वीज पडल्याने यातील दोन जण जागीच ठार झाले आहे. तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कोपरगाव येथे राहणारे हरपालसिंग बच्चनसिंग शिख (३०) व सुखमीत हरपालसिंग शिख हे कोपरगाव वरून मनमाड कडे जात होते. तर देवळा तालुक्यातील गिरणारे येथील रमेश संजय गाढे ( ४५) हे येवला येथून आपल्या गावी जात होते. सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास विसापूर फाटा गोरखनगर तालुका येवला येथे विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत असल्याने तिघेजण हे झाडाखाली उभी होते. त्याचवेळी अचानक वीज पडल्याने यात हरपालसिंग बच्चनसिंग शीख व रमेश संजय गाडे हे जागीच ठार झाले. तर हरपाल सिंग यांची पत्नी सुमितसिंग शिख या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर येवल्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे
नातेवाइकांकडून मिळालेल्या माहितीनुसार हरपल सिंग व सुमित सिंग यांचा काही दिवसांपूर्वीच विवाह झाला होता. तसेच रमेश संजय गाडे हे आपल्या घरी असलेल्या रुग्णांसाठी येवला येथे औषधे घेण्यासाठी आले होते.
गुजरखेडे येथे बैल मृत्यूमुखी
गुजरखेडे ता.येवला येथील सीताराम तुकाराम गायकवाड यांचा बैल वीज पडून मृत्युमुखी पडला आहे.
शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे