येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येवल्यात मंत्री छगन भुजबळ यांच्या वक्तव्या विरोधात शरद पवार गटाने तहसील कार्यालयावर आज निदर्शने केली. बीड येथे आयोजित राष्ट्रवादीतील अजित पवार गटाच्या सभेत छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्या विरोधात वक्तव्य केले. त्यानंतर राज्यात ठिकठिकाणी या वक्तव्याला विरोध केला जात आहे.
बीड येथे काल झालेल्या सभेनंतर आज येवल्यातील शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी भुजबळ यांनी केलेले वक्तव्य निंदनीय असून भुजबळांना उपमुख्यमंत्रीपदा बरोबरच अनेक मंत्रीपद दिलेले असतांना भुजबळ यांनी शरद पवार यांच्या विरोधात केलेली टिका मान्य नसल्याचे सांगितले. त्यानंतर निदर्शनेही केली. रद पवार गटाचे नेते माणिकराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी मोटरसायकल व्दारे तहसील कार्यालयावर जात तेथे निषेधाचे निवदेन तहसिलदारांना दिले.
काय घडले होते सभेत
बीडमधील सभा कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आयोजित केली होती. या सभेतून शरद पवार यांच्यावर टीकेची झोड उठणार, हे निश्चित होते. सभा सुरू झाली तेव्हा धनंजय मुंडे यांनी शेरोशायरी करीत दाद मिळवली. शरद पवार यांच्यावर टीका केली पण भाषा सौम्य होती. त्यानंतर काहींची भाषणे झाली. पण मंत्री छगन भुजबळ यांचे भाषण सुरू झाले. त्यांनी भाषणातून शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. त्यामुळे सभेत बसलेले शरद पवार समर्थक, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भडकले आणि त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या विनंतीला मान देऊन मांडवात थांबलेले लोक निघायला लागले. परिणामी भुजबळ यांनी दोनच मिनिटांत भाषण आवरते घेतले.
yeola minister chhagan bhujbal statement agitation