येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दारु पिणे हे वाईट आहे. दारुचे व्यसन नको, असे वारंवार बोलले जाते. खासकरुन पुरुषांमध्ये दारुचे व्यसन असल्याचेही सांगितले जाते किंवा दिसते. भररस्त्यात जर दारुच्या बाटल्यांचे खोके पडले तर काय होईल…. सहाजिकच पुरुषांची झुंबड उडेल. पण, याउलट घडले आहे. लहान मुले आणि महिलांनीच या दारुच्या बाटल्या उचलण्याला प्राधान्य दिल्याचे दिसून आले आहे.
छत्रपती संभाजी नगर-नाशिक महामार्गावर येवल्या जवळ ही घटना घडली आहे. एक ट्रक दारुच्या बाटल्यांचे खोके घेऊन जात होता. मात्र, या ट्रकमधील दारूचे काही बॉक्स पुरणगाव जवळ महामार्गावर पडले. ही बाब परिसरात वाऱ्यासारखी पसरली. महामार्गावरील दारूच्या बाटल्या गोळा करण्यासाठी लहान मुलांसह मोठ्यांची तोबा गर्दी झाली. काही क्षण तर वाहतूकही ठप्प झाली. दारूच्या काही बाटल्या फुटल्या होत्या. असे असतानाही तशाच परिस्थितीत दारू बाटल्या गोळा करण्यासाठी चढाओढ दिसून आली. या सर्व घटनेचा व्हिडिओ मात्र प्रचंड व्हायरल झाला आहे.
बघा हा व्हिडिओ
Yeola Highway Liquor box Viral Video