येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गोल्डमॅन म्हणून राज्यभर प्रसिद्ध असलेले पंकज पारख यांना ग्रामीण पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने नाशिक येथे अटक केली आहे. कै. सुभाषचंद्र पारख पतसंस्थेमध्ये झालेल्या २२ कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात ते मुख्य आरोपी आहेत. बँकेचे प्रशासक व सहाय्यक निबंधक प्रताप पाडवी यांनी या घोटाळ्याची तक्रार दिली होती. या तक्रारीवरुन २१ कोटी ९६ लाख ९९ हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात पंकज पारख, चेअरमन योगेश सोनी, व्यवस्थापक अजय जैन आणि संचालक मंडळ आरोपी करण्यात आले होते.
येवल्यात गुन्हा दाखल
येवला येथे २०२१ मध्ये कै. सुभाषचंद्रजी पारख नागरी सहकारी पतसंस्थेच्या संस्थापक पंकज पारख, चेअरमन योगेश सोनी, व्यवस्थापक अजय जैन यांचेसह संचालक मंडळ, वसुली अधिकारी यांचे विरुद्ध शहर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल झाला होता. त्यात २१ कोटी ९६ लाख ९९ हजाराचा अपहार, ठेवीदारांची फसवणूक प्रकरणात सहाय्यक निबंधक प्रताप पाडवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
असा आहे घोटाळा
सहाय्यक निबंधक पाडवी हे पारख पतसंसथेचे संचालक मंडळ बरखास्ती नंतर प्रभारी प्रशासक म्हणून काम पाहत आहेत. पतसंस्थेचा ताळेबंद प्रमाणे आढावा घेतला असता ती तोटयात असल्याचे त्यांचे निदर्शनास आले. पतसंस्थेतील काही रकमा पतसंस्थेत जमा केलेल्याच नाही. ९३ कर्जदारांना मुदत पावती नसतांना व कोणताही मागणी अर्ज नसतांना बेकायदेशीर मुदत पावतीवर कर्ज वाटप करून निधीचा अपहार केला गेला आहे. तसेच अनियीमत कर्ज वाटप करून कर्ज वसुली केलेली नाही. त्याच प्रमाणे सोने तारण कर्ज देखील अनियमित व कोणतेही तारण न घेता कर्ज वाटप केले. त्यात अनियमितता व ठेवीदारांची फसवणूक करण्यात आली.
काहींना कोणताही जामीन अगर तारण न देता कर्ज वाटप केलेले आहे. २०१५ पासुन ते प्रशासक नियुक्तीपर्यन्त सभेचे इतीवृत्त गहाळ केले गेले आहे. आपसात संगनमत करून बेकायदेशीररित्या कर्ज प्रकरणे मंजुर करुन बँकेतुन परस्पर रक्कम काढुन घेवुन २१ कोटी ९६ लाख रुपयेचा अपहार केला व संस्थेच्या सभासदांची ठेविदारांची फसवणुक केल्याचे सदर फिर्यादीत म्हटले आहे.
Yeola Goldman Pankaj Parakh Arrested in Fraud Case
Nashik Crime