येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील दत्तवाडी येथे असलेल्या जगदंबा अँटो गॅरेजचे दुकान अज्ञान चोरट्यांनी फोडत दुकानातून महागड्या किंमतीचे अँटो पार्टसचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना घडली आहे. चार चोरट्यांनी ही चोरी केली असून या चोरीची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. पोलिस सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत असून, चोरट्यांना शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.