येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील मातुलठाण येथील हिरालाल घुगे या शेतक-याने मोबाईल टॉवरवर चढत शोले स्टाईल आंदोलन केले. इंडेक्स कंपनी तर्फे गावात उभारण्यात येणाऱ्या टॉवरला विरोध करण्यासाठी त्यांचे हे आंदोलन होते.
या कंपनीचे अधिकारी गावातील शेतक-यांकडून जमिन व पैसे घेऊन त्यांची फसवणूक करीत असल्याचा त्यांचा आरोप आहे. त्या विरोधात घुगे यांनी टॉवरवर चढत हे आंदोलन केले. या आंदोलनानंतर अखेर पोलिस व प्रशासनाने त्यांची समजूत काढली. त्यानंतर त्यांनी आपले आंदोलन स्थगित केले. पण, या आंदोलनाची सर्वत्र चर्चा झाली.
मालेगावमध्ये बारा बलुतेदार संघटनेचा निषेध मोर्चा
मालेगावमध्ये बारा बलुतेदार संघटनेतर्फे मोर्चा काढत संताप व्यक्त करण्यात आला. निमित्त आहे ते कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीचे. या निवडणुकीत मागासवर्गीय कामागाराचा सामाजिक कार्यक्रमाच्या फ्लेक्सवर छायाचित्र टाकण्यात आले. त्यामुळे आकसबुद्धीतून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी राजकीय दबावातून त्याला निलंबित केले. तसेच, निवडणूक आचार संहितेचा भंग केल्याचा ठपका ठेवला. याच्या निषेधार्थ बारा बलुतेदार संघटनेतर्फे मोर्चा काढत संताप व्यक्त करण्यात आला.
यावेळी हातात काळे ध्वज घेऊन मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी प्रशासकाचा विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. संबंधित कर्मचाऱ्याचे निलंबन त्वरित मागे घ्यावे व निवडणूक प्रचारात प्रत्यक्ष सहभाग घेणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे तसेच बाजार समिती गाळे हस्तांतराची कारवाई विनाविलंब करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
Yeola Farmer Sholey Style Agitation