येवला – येवला तालुक्यातील सातारे येथील सारिका मच्छिंद्र जाधव (२७) रा. शेवगे या महिलेचा गावातील सरकारी विहिरीच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या महिलेचा मृतदेह गुरुवारी पाण्यावर तरंगताना आढळून आला. या घटनेत मृत्यूमागील कारण अद्याप पुढे आले नाही. या घटनेची माहिती प्रवीण बाळासाहेब झांबरे यांनी येवला तालुका पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी येवला तालुका पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे.