येवला – कोरोनाची साखळी तुटावी यासाठी सोशल डिस्टन्सिंग ठेवण्याचे सांगितले जाते. पण, येवला येथे लसीकरणासाठी इतकी गर्दी झाली की येथे फज्जा उडाला. ही गर्दी येथील स्वामी मुक्तांनंद विद्यालयातील लसीकरण केंद्रावरील आहे. देशभर लसीचा तुटवडा असल्यामुळे सर्वत्र अशी गर्दी दिसत आहे. त्यात येवलाही अपवाद ठरले नाही. विशेष म्हणजे कोरोनाची साखळी तुटावी यासाठी येवला शहरात चार दिवसाचा जनता कर्फ्यू आहे. त्यात ही गर्दी झाली.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!