सुयश सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
नगर – मनमाड महामार्गावर सावरगाव या ठिकाणी भूरुक वस्ती जवळ शिर्डी येथे डाळिंब भरण्यासाठी जात असलेल्या पिकअपचा आणि समोरून येत असलेल्या कंटेनरचा भीषण अपघात झाला. या अपघातात पिकअप मधील पाच जण गंभीरित्या जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. गुरुवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात मालेगाव येथील विनोद पवार, इमरान शेख ,सनी अहिरे, मनोज कत्यारे, अनिल माळी हे जखमी झाले आहे. अनिल माळी याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याची प्रकृती चिंताजनक आहे. माळी यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलवण्यात आले आहे.