वर्षातली पहिली संकष्टी चतुर्थी
देवाधिदेव गणपती यांची आज २१ जानेवारीला वर्षातली पहिली संकष्टी चतुर्थी आहे. साधारण तीन प्रकारच्या चतुर्थी गणेश भक्तांकडून पाळल्या जातात. विनायक चतुर्थी, संकष्ट चतुर्थी ,गणेश चतुर्थी यांचा त्यात समावेश आहे.
प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्येनंतर येणाऱ्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात. पौर्णिमेनंतर येणाऱ्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात. गणेश चतुर्थी ही फक्त माघ महिन्यामध्ये माघी गणपती उत्सव स्वरूपात साजरी केली जाते. या तिन्ही चतुर्थी दिवशी उपवास तसेच विविध गणेश व्रत करणारे लाखो गणेश भक्त जगभर आहेत.
चतुर्थी दिवशी मुख्यतः गणपती अथर्वशीर्ष सहस्त्रावर्तन त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी गणेश याग केले जातात. गणेश आरती नंतर मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो. यंदाच्या वर्षी देखील बारा विनायक आणि बारा संकष्ट चतुर्थी येणार आहेत. उद्या गणेश दर्शनासाठी दिवसभर मुहूर्त आहे तर उद्याचा उपवास सोडण्यासाठी चंद्रोदय मुहूर्त रात्री नऊ वाजून वीस मिनिटांनी आहे.