पुणे – आधुनिक काळात मोबाईल वापरणे ही अत्यंत आवश्यक गोष्ट झाली आहे, किंबहुना मोबाईल शिवाय दैनंदिन जीवन जगणे अशक्य आहे, असे देखील म्हटले तर वावगे ठरणार नाही. परंतु अनेक मोबाईल रिचार्ज प्लॅन कंपन्यांनी आपले प्लॅन महाग केल्याने ग्राहकांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. मात्र त्यातही स्पर्धा असल्याने काहींनी अद्याप त्या किंमतीत वाढ केलेली नाही, त्यामुळे ग्राहकांना समाधान मिळत आहे.
एकीकडे एअरटेलचा आणि व्होडाफोन – आयडियाने त्यांचे प्रीपेड रिचार्ज प्लॅन सुमारे 500 रुपयांनी महागले आहेत. मात्र, दुसरी कडे रिलायन्स जिओच्या वापरकर्त्यांना सध्या मोठा दिलासा मिळाला आहे. जिओने अद्याप आपल्या रिचार्ज प्लॅनची किंमत वाढवली नाही.
आता Reliance Jio, Airtel आणि Vodafone-Idea च्या वर्षभराच्या रिचार्ज प्लॅनबद्दल जाणून घेणार आहोत. कारण हा प्लॅन घेतल्यानंतर तुम्हाला वर्षभर फोन रिचार्ज करण्याची गरज नाही. Airtel आणि Vodafone-Idea च्या तुलनेत रिलायन्स जिओचा रिचार्ज प्लॅन 600 रुपयांनी स्वस्त मिळत आहे.
जिओ 2399 प्लॅन
रिलायन्स जिओचा वर्षभराचा प्लॅन 2,399 रुपयांचा आहे. या प्लॅनमध्ये 365 दिवसांची वैधता उपलब्ध आहे. यामध्ये दररोज 2GB डेटा दिला जातो. म्हणजेच प्लॅनमध्ये एकूण 730GB डेटा उपलब्ध आहे. जिओच्या या प्लॅनमध्ये मोफत कॉलिंगसह दररोज 100 एसएमएस पाठवण्याची सुविधा उपलब्ध आहे. तसेच, Jio अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे.
एअरटेल 2999 प्लॅन
एअरटेलच्या 2,999 रुपयांच्या प्लॅनची वैधता 365 दिवसांची आहे. Airtel चा हा प्लॅन Jio च्या प्लॅन पेक्षा 600 रुपये महाग आहे.एअरटेलच्या या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा दिला जातो. म्हणजेच प्लॅनमध्ये एकूण 730GB डेटा उपलब्ध आहे. प्लॅनमध्ये मोफत कॉलिंगसह दररोज 100 एसएमएस पाठवण्याची सुविधा देण्यात आली आहे.
Voda-Ideaचा 2899 प्लॅन
Vi चा 2899 रुपयांचा वार्षिक प्लॅन आहे. Voda-Idea हा प्लान Jio च्या प्लान पेक्षा 500 रुपये जास्त महाग आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना 365 दिवसांची वैधता मिळते. प्लॅनमध्ये यूजर्सला दररोज 1.5GB डेटा मिळतो. प्लॅनमध्ये एकूण 547.5 GB डेटा उपलब्ध आहे. यामध्ये कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग उपलब्ध आहे. तसेच, दररोज 100 एसएमएस पाठवण्याची सुविधा आहे. या प्लॅनमध्ये तुम्ही दुपारी 12 ते सकाळी 6 पर्यंत कितीही डेटा वापरू शकता