मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या नव्या कुलगुरुंच्या निवडीसाठी राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी निवड समिती गठित केली आहे. एनसीईआरटीचे माजी संचालक प्रा. जगमोहन सिंह राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड समिती गठित करण्यात आली आहे.
सुरत येथील सरदार वल्लभभाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे संचालक प्रा. अनुपम शुक्ला, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी तसेच भोपाळ येथील मध्य प्रदेश भोज मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. रवींद्र कान्हेरे (यूजीसी प्रतिनिधी) हे या समितीचे अन्य सदस्य असतील.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. ई वायुनंदन यांचा कार्यकाळ दिनांक ७ मार्च २०२२ रोजी संपल्याने विद्यापीठाचे कुलगुरुपद रिक्त झाले होते. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांतकुमार पाटील यांचेकडे सदर पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.
YCMOU Vice Chancellor Selection Committee