नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामार्फत पुनर्परीक्षार्थीींना ऑनलाइन परीक्षा अर्ज भरण्यासाठी १२ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यानंतर कोणत्याही कारणास्तव मुदतवाढ दिली जाणार नसल्याची माहिती परीक्षा नियंत्रक भटू प्रसाद पाटील यांनी दिली.
अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत विद्यार्थ्यांच्या विनंतीनुसार वाढ करण्यात आली आहे. सर्व अभ्यासक्रमांसाठी व्यावसायिक, तांत्रिक व सायन्स शाखेच्या पुनर्परीक्षार्थीींना प्रती पेपर १५० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. तसेच अन्य अभ्यासक्रमांच्या पुनर्परीक्षार्थीसाठी हे शुल्क १३० रुपये असणार आहे. प्रात्यक्षिक किंवा तोंडी परीक्षा शुल्क प्रति पेपर ३०० रुपये व विलंब शुल्क १०० रुपये असे शुल्क पुनर्परीक्षार्थीींना अर्ज दाखल करताना भरावे लागणार आहे. याबाबतची सविस्तर सूचना विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात आली असून, त्यानुसार पुनर्परीक्षार्थीनी येत्या दोन दिवसात म्हणजे १२ नोव्हेंबरपर्यंत अर्ज दाखल करायचे आहेत. याबाबतची सविस्तर माहिती विद्यापीठाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.
YCMOU Open University Reexam