नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा २८ वा दीक्षांत (पदवीदान समारंभ गुरुवार दि. २३ फेब्रुवारी २०२३ रोजी नाशिक येथे सकाळी १०.३० वाजता विद्यापीठ मुख्यालयातील प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे. त्यामध्ये २०२१ व २०२२ ह्या वर्षात (डिसेंबर २०२१ मे २०२२ व जून २०२२ ह्या परीक्षांमध्ये) उत्तीर्ण झालेल्या पदवीधरांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्यक्ष उपस्थित राहू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी https://28convocation.ycmou.ac.in/ या लिंकवर जाऊन नोंदणी करावी असे आवाहन कुलसचिव तथा परीक्षा नियंत्रक भटुप्रसाद पाटील यांनी केले आहे.
ऑनलाईन नोंदणी केल्यानंतरच विद्यार्थ्यांना विद्यापीठात दीक्षांत समारंभास उपस्थित राहून पदवी ग्रहण करता येईल. याबाबतची सर्व माहिती समारंभापूर्वी वेळोवेळी विद्यापीठ पोर्टलला प्रसिद्ध केली | जाईल. ज्या विद्याथ्र्यांनी ह्या वेब पेजवर आपल्या उपस्थिती बाबतची ऑनलाईन स्वीकृती नोंदवली आहे त्यांनाच दीक्षांत समारंभाच्या दिवशी पदविका, पदवी प्रमाणपत्रे प्रदान करण्यात येतील. ज्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली नाही. त्यांची पदविका/ पदवी प्रमाणपत्रे दीक्षांत समारंभानंतर काही कालावधीत त्यांच्या अभ्यासकेंद्रामार्फत वितरीत केली जातील. त्यांना विद्यापीठात येण्याची आवश्यकता नाही.
नोंदणी न करता आलेल्या विद्यार्थ्यांना पदविका/ पदवी प्रमाणपत्र दिले जाणार नाही याची नोंद घ्यावी. पीएच डी पदवीसाठी पात्र विद्यार्थ्यांनी येथे उपस्थितीबाबत माहिती नोंदविण्याची आवश्यकता नाही. त्यांची उपस्थिती ग्राह्य धरण्यात आलेली आहे. असे कळविण्यात आले आहे. उपस्थित राहण्याबाबतची प्रक्रिया आणि त्यासाठी आवश्यक अनामत शुल्काबाबतची माहिती https://28convocation.ycmou.ac.in/ या लिंकवर उपलब्ध आहे.
YCMOU Convocation Students Registration