अमळनेर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या येथील प्रताप कॉलेजमध्ये असलेल्या केंद्रातील बहिस्थ परीक्षक ५ हजाराची लाच घेताना सापडला आहे. विजय गुलाबराव पाटील (वय ५० वर्ष) असे लाचखोराचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) कारवाईत ही बाब समोर आली आहे.
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अंतर्गत बिलीप (Bachelor of Library) ची अंतिम परीक्षा एक विद्यार्थीनी देत आहे. या परीक्षेचे पेपर्स हे अमळनेर प्रताप महाविद्यालय येथे सुरू आहेत. या विद्यार्थीनीसह तिच्या सोबतच्या एकूण ८ विद्यार्थ्यांना परीक्षक पाटील हा पेपर्स घेऊन विनाकारण त्रास देत होता. हा त्रास न देता सहकार्य करण्यासाठी प्रत्येक विषयासाठी १००- रूपये असे एकूण ९ विषयाचे मिळून प्रत्येक विद्यार्थ्याकडे ९०० रूपये असे एकूण ७२०० रुपयाची लाचेची मागणी लाचखोर पाटील करत होता.
याप्रकरणी एसीबीकडे तक्रार देण्यात आली. तडजोडी अंती ५६०० रुपयाची लाचेची मागणी करून ५ हजार रुपये तडजोडी अंती निश्चित करण्यात आले. आणि हीच लाचेची रक्कम पंचांसमक्ष स्वीकारताना लाचखोर पाटील हा रंगेहात सापडला. याप्रकरणी त्याचे विरुद्ध अमळनेर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे .
*सापळा अधिकारी-*
*अनिल बडगुजर* पोलीस उप आधीक्षक, ला.प्र.वि.नासिक. 8999962057
*सापळा पथक*-
राजेन्द्र गिते, संदीप बत्तिसे, संजय ठाकरे, संतोष गांगुर्डे सर्व नेमणूक ला.प्र.वि.नासिक
*मार्गदर्शक-*
*मा.सौ.शर्मिष्ठा घारगे-वालावलकर साो,* पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक 9371957391
*मा.श्री.नरेंद्र पवार*, वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक. 982262728
*सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क साधावा.*
*अँन्टी करप्शन ब्युरो, नासिक*
YCMOU Amalner Bribe Corruption