नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मणिपूर हिंसाचाराच्या संदर्भात विरोधकांनी केंद्र सरकारविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावरील चर्चेच्या दुसऱ्या दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत उत्तर दिले. यावेळी शाह यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. आपल्या भाषणादरम्यान अमित शाह यांनी एका घटनेचा संदर्भ देत म्हटले की, राहुल गांधी एकदा एका गरीब महिला कलावतीच्या घरी जेवणासाठी गेले होते. गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या भाषणात ज्या कलावतींचा उल्लेख केला होता.
गृहमंत्री अमित शहा सभागृहात म्हणाले की, “राहुल गांधी कलावती यांच्या घरी जेवायला गेले, त्यानंतर त्यांनी सभागृहात गरिबीचे वर्णन केले. यानंतर त्यांचे सरकार ६ वर्षे चालले, पण मी विचारतो की त्यांच्या सरकारने कलावतींना कुठलीही केली नाही. त्यासाठी तुम्ही काय केले? त्या कलावतीला घर, वीज, गॅस, शौचालय, धान्य, आरोग्य देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले.”, असे त्यांनी स्पष्ट केले.
कलावती कोण आहेत?
गृहमंत्र्यांनी उल्लेख केलेल्या कलावती या यवतमाळ जिल्ह्यातील जलका गावातील रहिवासी आहेत. शेतकरी आत्महत्यांमुळे हा संपूर्ण परिसर चर्चेत आहे. कर्ज फेडता न आल्याने कलावती यांच्या पतीने आत्महत्या केली होती. २००८ मध्ये तत्कालीन खासदार राहुल गांधी यांनी कलावती यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर कलावती कर्जबाजारी शेतकऱ्यांचा चेहरा बनल्या आणि त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या. त्यांची बातमी राष्ट्रीय माध्यमात आल्यानंतर त्यांना देशभरातून मदत मिळू लागली.
राहुल गांधी कलावती यांच्या घरी पोहोचल्यानंतर कलावती यांना सुलभ इंटरनॅशनलकडून ३० लाख रुपयांची आर्थिक मदत मिळाली. हे पैसे सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या एका शाखेत कलावती यांच्या नावावर मुदत ठेव म्हणून जमा करण्यात आले. ज्यातून कलावतीने तिच्या ४ मुलांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आणि आरामदायी जीवन जगण्यास मदत करण्यासाठी २५ हजार रुपये मासिक व्याज मिळण्यास सुरुवात केली. त्याचवेळी नंतर केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी यांनीही कलावती यांना एक लाख रुपयांची मदत देऊ केली.
कलावती यांनी स्पष्टच सांगितलं..
कलावती यांनी माध्यमांना सांगितले आहे की, राहुल गांधी मला भेटले आणि त्यांनी माझी गरिबी दूर केली. गेल्या वर्षी भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी कलावती यांची भेट घेतली होती. अतिम शाह यांनी संसदेत कलावती यांच्या मदतीचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर कलावती यांच्याकडे माध्यमांनी धाव घेतली. त्यांना विचारले की, तुम्हाला नक्की कुणामुळे मदत मिळाली. राहुल गांधी की पंतप्रधान मोदी यावर कलावती यांनी स्पष्टपणे सांगितले की, मला राहुल गांधी यांच्यामुळेच मदत मिळाली आहे. अमित शाह यांनी खोटी माहिती दिली आहे.
बघा, कलावती काय म्हणाल्या त्याचा हा व्हिडिओ
Yawatmal Poor Farmer Kalawati Help Rahul Gandhi Narendra Modi Amit Shah
Politics Parliament Loksabha Mosoon Session 2023