बुधवार, सप्टेंबर 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

यवतमाळमध्ये दीड हजार घरांची पडझड… २८० नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले…

by Gautam Sancheti
जुलै 23, 2023 | 5:59 pm
in संमिश्र वार्ता
0
0x570 2

यवतमाळ (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या दोन दिवस झालेल्या सततधार पावसामुळे सर्वत्र मोठे नुकसान झाले आहे. शेतपिकांसह घरे, जनावरे, शासकीय मालमत्तेचीही हाणी झाली. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या कुटुंबांना तातडीने 5 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान व धान्याचे वाटप करा. नुकसानीचे पंचनामे करून अहवाल सादर करा, असे निर्देश मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात श्री.पाटील यांनी जिल्ह्याच्या पुरपरिस्थितीचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला पालकमंत्री संजय राठोड, आ.मदन येरावार, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलिस अधीक्षक पवन बनसोड, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिह दुबे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यात परवा प्रचंड पाऊस झाला. बहुतांश मंडळामध्ये अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेती व घराचे देखील नुकसान झाले. नुकसानग्रस्तांना योग्य मोबदला मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वे तातडीने करण्यात यावे. एकही नुकसानग्रस्त सुटणार नाही याची दक्षता घ्या. शेतपिकांचे नुकसान झालेच शिवाय शेतजमिनी देखील खरडून गेल्या, त्याचा स्वतंत्र अहवाल सादर करावा. तातडीची मदत म्हणून शासनाच्या धोरणाप्रमाणे नुकसानग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी 5 हजाराचे सानुग्रह अनुदान व धान्य दोन दिवसात वाटप करा. धान्य देत असतांना धान्यासोबत अन्य आवश्यक खाद्य पदार्थाची किट सामाजिक संस्थांच्या मदतीने देता येईल तर तसा प्रयत्न करावा, असे श्री.पाटील म्हणाले.

शेती व शेतपिकांसह शासकीय मालमत्तेचे जे नुकसान झाले आहे, त्याचे देखील सर्वेक्षण करण्यात यावे. या नुकसानीसाठी जिल्ह्याला जास्तीत जास्त निधी कसा उपलब्ध करून देता येतील यासाठी प्रयत्न करू. स्थलांतरीत केलेल्या नागरिकांना निवारागृहात भोजनासह आवश्यक सुविधा पुरविण्यात याव्या. कृषि, सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपआपल्या मालमत्तांच्या नुकसानीचे सर्वेक्षण करून अहवाल मदत व पुनर्वसन विभागास सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

अतिक्रमीत जागेवर वास्तव्य करणाऱ्या अनेक गोरगरिबांची घरे पडली आहे. अशा अतिक्रमीत नुकसानग्रस्तांना देखील मदत मिळणे आवश्यक असल्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी बैठकीत सांगितले. त्यांना कशी मदत करता येईल यासाठी निश्चितच प्रयत्न करू असे श्री.पाटील यांनी सांगितले. खरडून गेलेल्या जमीनीचा स्वतंत्र अहवाल करावा, असे निर्देश बैठकीत पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले. आ.मदन येरावार यांनी यवतमाळ शहरात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्तांना सानुग्रह अनुदान लगेच वाटप करणे आवश्यक आहे, असे सांगितले.

सुरुवातीस जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्ह्याच्या पुरपरिस्थितीची माहिती दिली. सततधारमुळे 1 हजार 426 घरांची पडझड झाली आहे. त्यात अंशत: 1 हजार 189 तर पुर्णत: पडझड झालेल्या 237 घरांचा समावेश आहे. जवळजवळ 280 नागरिकांना बचाव पथकांद्वारे पुरातून सुरक्षित बाहेर काढण्यात आले. 6 हजार 275 नागरिकांना स्थलांतरीत करून तात्पुरत्या निवारागृहात त्यांनी निवास व भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. एकून तीन व्यक्तींना मृत्यू झाला असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

बचाव पथकाचे दोनही मंत्र्यांकडून कौतूक
काल जिल्ह्यात सर्वत्र पुरस्थिती होती. अडकलेल्यांना पुरातून सुरक्षित बाहेर काढणे शोध व बचाव पथकांसमोर मोठे आवाहन होते. ठिकठिकाणी जिल्हा व तालुका पथकांनी उत्तम कामगिरी करत तब्बल 280 नागरिकांनी सुरक्षित बाहेर काढले. अनेकांचे सुरक्षेच्यादृष्टीने स्थलांतरण करण्यात आले. त्यामुळे बचाव पथकातील सदस्यांचे पालकमंत्री संजय राठोड, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी कौतूक केले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशकात तरुणाच्या हत्येप्रकरणी चौघे ताब्यात… कसून चौकशी सुरू

Next Post

सर्व शालेय पाठ्यपुस्तके बदलणार… यासाठी घेतला हा निर्णय…

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

Denver Mahesh Babu Launching Mobile Banner 03 1 e1758715475805
संमिश्र वार्ता

सुपरस्टार महेश बाबूने केली एक ब्रॅंड फिल्म लॉन्च…या पर्फ्यूम्सचा करणार प्रचार

सप्टेंबर 24, 2025
प्रातिनिधिक फोटो
महत्त्वाच्या बातम्या

केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी…१०,९१,१४६ रेल्वे कर्मचाऱ्यांना मिळणार इतका बोनस

सप्टेंबर 24, 2025
Campus 1
स्थानिक बातम्या

दशकपूर्ती….राज्यातील पहिल्या तीन हॉस्पिटलमध्ये एसएमबीटी…६०० तज्ञ डॉक्टरांची टीम

सप्टेंबर 24, 2025
crime1
क्राईम डायरी

पोलिसांना जप्त केलेल्या १६ दुचाकी वाहनांचे मालकच सापडेना….मग, या पत्त्यावर पाठवले समजपत्र

सप्टेंबर 24, 2025
Untitled 33
मुख्य बातमी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची केली पाहणी

सप्टेंबर 24, 2025
jail1
क्राईम डायरी

सव्वा लाखाचे मॅफेड्रॉन जप्त…दोघांना पोलीसांनी ठोकल्या बेड्या

सप्टेंबर 24, 2025
Untitled 32
संमिश्र वार्ता

अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची आमदार रोहित पवार यांनी केली पाहणी….केली ही मागणी

सप्टेंबर 24, 2025
Corruption Bribe Lach ACB
क्राईम डायरी

१२ हजाराची लाच घेतांना दोन कॅान्स्टेबलसह एक जण एसीबीच्या जाळ्यात

सप्टेंबर 24, 2025
Next Post
संग्रहित फोटो

सर्व शालेय पाठ्यपुस्तके बदलणार... यासाठी घेतला हा निर्णय...

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011