यवतमाळ (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – खरेतर जन्माला येणारे बाळ कसे असेल, हे कुणालाच माहिती नसते. पण सोनोग्राफीनंतर संबंधित तज्ज्ञाने व प्रसुतीरोगतज्ज्ञाने पोटात असलेल्या बाळामध्ये काही व्यंग आहे का, हे सांगणे गरजेचे आहे. यासंदर्भात हयगय करणाऱ्या डॉक्टरांना तब्बल ४० कोटी रुपयांचा दंड अलीकडेच ग्राहक आयोगाने ठोठावला आहे.
यवतमाळमधील हे प्रकरण असून. राठोड दाम्पत्याच्या संदर्भात आयोगाने हा महत्त्वाचा निर्णय दिला आहे. यवतमाळ येथील मनीषा श्रीकांत राठोड गर्भवती होत्या. त्यांच्यावर डॉ. अर्चना विरेंद्र राठोड या प्रसुतीरोगतज्ज्ञांकडे उपचार सुरू होता. नियमित उपचार सुरू असताना सोनोग्राफी देखील नियमित होत होती. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार डॉ. आशिष लोहिया यांच्या मंगलमूर्ती डायग्नॉस्टिक सेंटरमध्ये सोनोग्राफी व्हायची. बाळ एकदम सुस्थितीत असल्याचे दोन्ही डॉक्टर राठोड दाम्पत्याला सांगत होते. त्यामुळे तेही आनंदी होते.
दरम्यान, महिलेची प्रसुती झाली तेव्हा अघटितच घडले. बाळाच्या दोन्ही हातांना केवळ चार-चारच बोटे होती. तर पायांमध्ये हाडच नव्हते. शिवाय पाय आणि पायाची बोटेही व्यवस्थित नव्हती. डॉक्टरांनी सोनोग्राफीमध्ये सारेकाही उत्तम असल्याचे सांगितले. मात्र प्रत्यक्षात दिव्यांग बाळाची प्रसुती केली. त्यामुळे दाम्पत्याने ग्राहक आयोगाकडे धाव घेतली. आम्हाला नुकसानभरपाई मिळावी, अशी विनंती राठोड दाम्पत्याने आयोगाकडे केली. त्यानंतर आयोगाने दोन्ही डॉक्टरांना प्रत्येकी २० लाख असे एकूण ४० लाख रुपयांचा दंड ठोठावला.
हयगय केल्याचे सिद्ध
राठोड दाम्पत्याने यवतमाळ जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे तक्रार केली. आयोगाचे अध्यक्ष नंदकुमार वाघमारे व सदस्य हेमराज ठाकूर यांच्यापुढे प्रकरणाची सुनावणी झाली. यामध्ये राठोड दाम्पत्याने हयगय केल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर डॉ. अर्चना राठोड व डॉ. आशिषकुमार लोहिया यांना प्रत्येकी २० लाख रुपयांचा दंड ठोठावला.
Yavatmal Doctor 40 Lakh Fine Women Delivery Negligence Treatment
Health Medical Hospital